आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिनबाबत जागृती नसणे आणि संकोच यामुळे मोकळेपणाने बोलले जात नाही. परिणामी यातून आरोग्यविषयक जोखीम आणि प्रश्न निर्माण होतात. बिहारमधील मधेपुरा, सहरसा, पश्चिम चंपारणच्या महिलांनी अशाच समस्यांच्या निराकरणाचा प्रयत्न केला आहे. त्यावर उपाय म्हणून या महिलांनी माय पॅड एटीएम सुरू केले आहे.
या एटीएमद्वारे गावांतील महिला मासिकधर्माच्या काळातील समस्यांशी केवळ लढतच नाहीत, तर त्यांच्या प्रयत्नांतून हा समुदाय आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहे. कारण एटीएम चालवणाऱ्या महिलांना पॅडच्या किमतीतील ५० टक्के रक्कम मिळते. या रकमेतून त्या गावातील स्वच्छतेसाठी सामान म्हणजे झाडू, कुदळ, टोपले, फिनाइल इत्यादींची खरेदी करतात. बेतियाच्या मटियारा टोला येथील निर्मलादेवी म्हणाल्या, गावात मेडिकल स्टोअर नाही. त्यामुळे पॅड खरेदीसाठी दहा किमीवरील नौरंगिया येथे जावे लागे. परंतु गुंज संस्थेच्या मदतीने माय पॅड एटीएम तयार करण्यात आले. गुंजकडून कपडा दिला जातो. त्याच कपड्यातून घरीच सॅनिटरी पॅड बनवले जातात आणि गावातील सर्व महिलांना त्याचे वाटप केले जाते. मासिक काळात संसर्गजन्य आजारांपासून महिलांचा बचाव होत आहे. त्याशिवाय केवळ पॅडमुळे मुली शाळेतून घरी येत नाहीत. अडचणींवर मात करून स्वच्छतेच्या अभियानाची ही यशकथा आहे. आता गावाचे चित्र पालटले आहे. खगडियाची विद्यादेवी म्हणाल्या, गावातील महिला आधी मासिक काळात ज्यूटचा वापर करत. आता कपड्याने बनवलेल्या सॅनिटरी पॅडचा वापर करतात. मधेपूरच्या मालादेवी म्हणाल्या, दोन वर्षांपासून मी एटीएम चालवते. महिलांमध्ये जागृती आली आहे. पूर्वी अनेक आजार व्हायचे. आता त्रास नाही. सुती कापडामुळे ते गरम पाण्यात धुऊन पुन्हा वापरता येते हे विशेष.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.