आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Russia Sputnik Light May Be India's First Single Dose Vaccine | Narendra Modi Government Regulator Talk In June

देशाला मिळणार सिंगल डोस व्हॅक्सीन:रशियाच्या स्पुतनिक लाइटच्या मंजुरीवर सरकार आणि रेगुलेटरमध्ये पुढच्या महिन्यात होणार चर्चा, यामुळे 10 दिवसात 40 टक्के वाढते अँटीबॉडी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • स्पुतनिक लाइट 79.4% प्रभावी

देशात रशियाची व्हॅक्सीन स्पुतनिक V ची डिलीवरी सुरू झाल्याच्या दिवशीच यासंबंधीत एक चांगली बातमी आली आहे. सूत्रांनुसार, स्पुतनिक लाइट भारतात वापराची मंजुरी मिळवणारी पहिली सिंगल डोस व्हॅक्सीन ठरु शकते. पुढच्या महिन्यात सरकार आणि रेगुलेटर अथॉरिटीमध्ये याविषयावर चर्चा होणार आहे. या व्हॅक्सीनच्या वापरानंतर 10 दिवसांमध्ये 40 टक्के अँटीबॉडी विकसित होते.

डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजने शुक्रवारीच ही स्पुतनिक-V ची डिलीवरी सुरू केली आहे. यासाठी एका डोसची किंमत 995.40 रुपये ठरवली आहे.

स्पुतनिक लाइट 79.4% प्रभावी
रशियाने काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या सिंगल डोस व्हॅक्सीन बनवण्यात यश संपादन केले आहे. ही स्पुतनिक फॅमिलीतील नवीन व्हॅक्सीन आहे. ज्याचा सध्या यूरोप आणि अमेरिका वगळता जगातील 60 देशांमध्ये वापर होत आहे. स्पुतनिक लाइटला मॉस्कोच्या गमलेया रिसर्च इंस्टीट्यूटने बनवले आहे.

स्पुतनिक-V प्रमाणे यालाही रशियन डायरेक्ट इंवेस्टमेंट फंड (RDFI) ने फायनेंस केले आहे. RDFI चे CEO किरिल दिमित्रिएव यांच्यानुसार, जगभरात याची किंमत 10 डॉलर (जवळपास 730 रुपये) पेक्षा कमी राहिल.

कोरोनाच्या सर्व स्ट्रेनवर प्रभावी
या व्हॅक्सीनच्या फेज-3 ट्रायलमध्ये 700 लोकांचा समावेश करण्यात आला आहे. ट्रायल रशिया, UAE आणि घानामध्ये झाले. 28 दिवसांनंतर याचा डेटा एनालाइज करण्यात आला. याच्या परीणामांमध्ये दिसले की, ही व्हॅक्सीन व्हायरसच्या सर्व नवीन स्ट्रेनवर प्रभावी आहे. याच्या डेटानुसार ही व्हॅक्सीन दुसऱ्या डबल डोस व्हॅक्सीनपेक्षा जास्त प्रभावी आहे.

स्पुतनिक लाइटचे फायदे

 • याची ओव्हरऑल एफिकेसी 79.4% आहे. व्हॅक्सीन घेणाऱ्या 100% लोकांमध्ये 10 दिवसांनंतरच अँटीबॉडीज 40 टक्क्यांनी वाढल्या.
 • व्हॅक्सीन घेणाऱ्या सर्व लोकांमध्ये कोरोना व्हायरसच्या S-प्रोटीन विरोधात इम्यून रिस्पॉन्स डेव्हलप झाला.
 • या व्हॅक्सीनचे सिंगल डोस असल्यामुळे जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये लसीकरण वाढवले जाऊ शकेल.
 • स्पुतनिक लाइटला 2-8 डिग्री तापमानावर स्टोअर केले जाऊ शकते. यामुळे हे सहज ट्रान्सपोर्ट होऊ शकेल.
 • ज्या लोकांना पहिले कोरोना संक्रमण झाले आहेत, त्यांच्यावरही ही व्हॅक्सीन परीणामकारक आहे.
 • व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोरोनाच्या गंभीर परीणामांचा धोका कमी होतो. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडणार नाही.

जॉनसन अँड जॉनसनची सिंगल डोस व्हॅक्सीनही स्पर्धेत
अमेरिकन कंपनी जॉनसन अँड जॉनसनची सिंगल डोस व्हॅक्सीन लवकरच भारतात उपलब्ध होऊ शकते. खरेतर रक्त गोठल्यामुळे अमेरिका आणि दक्षिण अफ्रिकेत याच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. आता अमेरिकेने याच्या वापरावरील बंदी हटवली आहे. आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या सर्व कोरोना व्हॅक्सीनचे दोन डोस घ्यावे लागतात. त्यांच्यामध्ये एस्ट्राजेनेका, मॉडर्ना आणि फायझरसोबत भारतातील कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...