आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Russia Sputnik V Efficacy Against All New Coronavirus Strains | Covid 19 Vaccine Sputnik V News

रशियात सिंगल डोस व्हॅक्सीनला मंजूरी:स्पुतनिक लाइटचा एक डोस 80% प्रभावी, किंमत 10 डॉलर म्हणजेच 730 रुपयांपेक्षा कमी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्पुतनिक लाइट मॉस्कोच्या गमालय संशोधन संस्थेने बनवली आहे.

रशियाने कोरोनाची सिंगल डोस व्हॅक्सीन तयार करण्यास यश मिळवले आहे. या व्हॅक्सीनचे नाव स्पुतनिक लाइट आहे आणि ही व्हॅक्सीन 79.4% प्रभावी आहे. अशाच प्रकारे स्पुतनिक फॅमिलीची नवीन व्हॅक्सीन आहे. ज्याचा सध्या यूरोप आणि अमेरिका वगळता जगातील 60 देशांमध्ये वापर होत आहे. भारतानेही स्पुतनिक V ला मंजूरी दिली आहे. 1 मे रोजी याची पहिली खेप भारतात आली आहे. यामुळे अपेक्षा केली जात आहे की, या नवीन सिंगल शॉट लाइट व्हॅक्सीनला येणाऱ्या काळात देशात मंजूरी मिळू शकते.

स्पुतनिक लाइट मॉस्कोच्या गमालय संशोधन संस्थेने बनवली आहे. स्पुतनिक-V प्रमाणे, त्यालाही रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDFI) द्वारे फायनेंस केले आहे. RDFI चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीयेव यांनी गुरुवारी सांगितले की जगभरात त्याची किंमत 10 डॉलरपेक्षा कमी (सुमारे 730 रुपये) असेल.

या लसीच्या फेज-3 चाचणीमध्ये 7000 लोकांचा सहभाग होता. या चाचण्या रशिया, युएई आणि घाना येथे झाल्या. 28 दिवसांनंतर त्याच्या डेटाचे विश्लेषण केले गेले. परिणामांमध्ये असे आढळले आहे की ही लस विषाणूच्या सर्व नवीन स्ट्रेनवर प्रभावी आहे. त्याचा डेटा असे सूचित करतो की हे इतर अनेक डबल डोस लसींपेक्षा अधिक प्रभावी आहे.

स्पुतनिक लाइटचे फायदे

  • याची ओव्हरऑल एफिकेसी 79.4% आहे. व्हॅक्सीन घेणाऱ्या 100% लोकांमध्ये 10 दिवसांनंतरच अँटीबॉडीज 40 टक्के वाढल्या.
  • व्हॅक्सीन घेणाऱ्या सर्व लोकांमध्ये कोरोना व्हायरसच्या S-प्रोटीनविरोधात इम्यून रिस्पॉन्स डेव्हलप झाला.
  • या व्हॅक्सीनचे सिंगल डोस असल्यामुळे जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये लसीकरण वाढवले जाऊ शकेल.
  • स्पुतनिक लाइटला 2 ते 8 डिग्री टेम्प्रेचरवर स्टोअर केले जाऊ शकते. यामुळे ते सहज ट्रान्सपोर्ट होऊ शकेल.
  • ज्या लोकांना पहिलेच संक्रमण झाले आहे, ही व्हॅक्सीन त्यांच्यावरही प्रभावी आहे.
  • व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोरोनाच्या गंभीर परीणामांचा धोका कमी होईल. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडणार नाही.
बातम्या आणखी आहेत...