आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Russia Ukain Waar | Marathi News | Ukain Indian Students, Citizens Should Return From Ukraine; Center Advises, Air Force Ready For Emergency

रशिया युक्रेन वाद:भारतीय विद्यार्थी, नागरिकांनी युक्रेनमधून परत यावे; केंद्राचा सल्ला, आपत्कालीन स्थितीसाठी हवाई दल तयार

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनवर रशियाचा हल्ला होण्याची शक्यता असताना सरकारने तेथे शिक्षण घेत असलेले भारतीय विद्यार्थी आणि इतर नागरिकांना मायदेशात परतण्याचा सल्ला दिला. राजधानी कीव्ह येथील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांना किंवा भारतीयांना युक्रेनमध्ये राहणे गरजेचे नसेल, त्यांनी परत यावे.

‘दिव्य मराठी’ने परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेनमधील अनेक विद्यार्थ्यांशी चर्चाही केली. अधिकाऱ्यांनुसार, सध्या युक्रेनहून नागरी उड्डाणे सुरू आहेत आणि विद्यार्थ्यांसहित नागरिक तेथून बाहेर पडू शकतात. तथापि, युद्धाची स्थिती निर्माण झाली तर सरकार आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी वचनबद्ध आहे. दरम्यान, हवाई दलाच्या सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ ला सांगितले की, सी-१७ तसेच सुपर हर्क्युलस या विमानांचा ताफा कुठल्याही संकटकाळी भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी तत्पर आहे. आपत्कालीन तयारीला अंतिम रूप देण्यात आले आहे.

विद्यार्थी नाराज, सरकारने एवढा उशीर का केला?

भारत सरकारने हा सल्ला जारी करण्यासाठी एवढा वेळ का घेतला, या मुद्द्यावरून युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या २० हजार भारतीय विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. विद्यार्थ्यांनी म्हटले की, अनेक आठवड्यांपासून स्थिती बिघडत चालली आहे. इतर देशांनी आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अनेक आठवड्यांपासून उड्डाणे सुरू केली आहेत. विद्यार्थ्यांची परत येण्याची इच्छा असली तरी त्यांच्यासमोर काय पर्याय आहेत? उड्डाणे रद्द झाली आहेत. सामान्य स्थितीत विमानाचे भाडे ७० हजार आहे, ते आता दोन लाख रुपयांपर्यंत गेले आहे. हवाई क्षेत्र बंद होत चालले आहे. सरकारने विशेष विमाने संचालित करावी.

केंद्राचा सल्ला; आपत्कालीन स्थितीसाठी हवाई दल तयार

युक्रेनमध्ये काेणत्याही क्षणी रशियाकडून हल्ला हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियाचा मुकाबला करण्यासाठी ७९ वर्षीय आजीबाईंसह लहान मुलांनीही बंदुका उचलल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...