आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेनच्या दक्षिण भागातील युद्ध धोकादायक वळणावर पोहोचले आहे. रशिया या भागात सातत्याने हवाई करून युक्रेनला मागे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियावर युक्रेनचे बाखमूत शहर हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून भस्मसात केल्याचा आरोप केला आहे.
या हल्ल्यांत अनेक सर्वसामान्य नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. युक्रेनमधील डोनेटस्क, लुहान्स्क प्रांतांतील स्थितीत अत्यंत गंभीर होत आहे. झेलेन्स्कींनी सांगितले की, बाखमूत, सोलेडार, मारयिंका व क्रेमिन्ना शहरात अशी एकही जागा उरली नाही, जिथे रशियाचा हल्ला झाला नाही.
15 लाख लोक अंधारात
झेलेन्स्कींनी शनिवारी सांगितले की, रशिया रात्री उशिरा इराण बनावटीच्या कामिकाजे ड्रोनच्या मदतीने युक्रेनवर हल्ले करत आहे. यामुळे ओडेसातील जवळपास 15 लाख लोकांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. ओडेसासह युक्रेनच्या खार्किव्ह, सुमी, डनिप्रोपेट्रोव्हेस्क, झापोरिझिया व खरसोनमधील हवाई हल्ल्यांतही वाढ झाली आहे.
2 दिवसांत 60 रॉकेट्सचा मारा
युक्रेनच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार व शनिवार या सलग 2 दिवसांत रशियाने जवळपास 20 हवाई हल्ले व 60 रॉकेट्स डागले. त्यात 2 जण ठार, 8 जण जखमी झाले. रशियावर रुग्णालय, दुकाने व सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर हल्ले केल्याचाही आरोप होत आहे.
खरसोनमध्ये युक्रेनकडून गद्दारांचा शोध
युक्रेनने गत महिन्यातच खरसोन शहर रशियाच्या ताब्यात मुक्त केल्याची घोषणा केली होती. येथील युद्धाच्या मैदानातील स्थिती झपाट्याने बदलत आहे. रशिया कोणत्याही स्थितीत मागे हटण्यास तयार नाही. गत काही दिवसांपासून त्याने खरसोनवरील हवाई हल्ल्यांत वाढ केली आहे. युक्रेन आता रशियन लष्करासोबत संगनमत करुन देशद्रोह करणाऱ्या गद्दारांचा शोध घेत आहे.
खेरसोनमध्ये गद्दारांना शोधण्यासाठी अधिकारी सर्वच नागरिकांचे ओळखपत्र पडताळून पाहत आहे. स्थानिकांची चौकशीही केली जात आहे. कारींची झडती घेतली जात आहे.
गव्हर्नर यारोस्लाव यानुशेविचने एएफपीला सांगितले की, काही लोक येथे गत 8 महिन्यांपासून राहून रशियन सरकारसाठी काम करत होते. पण आता आमच्याकडे त्या सर्वांची माहिती आहे. आमच्या पोलिसांना सर्वकाही ठावूक आहे. या सर्वांना शिक्षा केली जाईल.
खरसोनमधून 130 गद्दारांना अटक
खरसोनला रशियाच्या तावडीतून मुक्त केल्यानंतर युक्रेनने तेथील 130 गद्दारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. युक्रेनच्या लष्कराने खरसोनवर ताबा घेतल्यानंतर स्थानिकांनी रशियाच्या कौतुकासाठी लावलेले बिलबोर्ड्स काढून टाकले आहेत. त्याच्या जागी युक्रेनचे पोस्टर्स लावले आहेत. संपूर्ण खरसोनमध्ये गद्दारांची माहिती देण्यासाठी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. एफपीशी बोलताना खरसोन पोलिसांनी गद्दारांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून चांगली मदत होत असल्याचे सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.