आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Russia's Sputnik V Vaccine Is On The Market In 10 Days, The Price In India Can Be 300 To 600 Rupees

लस भारतात दाखल:रशियाची स्पुटनिक-व्ही लस 10 दिवसांनी बाजारात, भारतात 300 ते 600 रुपये असू शकते किंमत

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लस वापरण्यासाठी आपत्कालीन मंजुरी मिळाल्यानंतर डॉ. रेड्डीज लॅबने रशियाची स्पुटनिक-व्ही लस आयात केली आहे. लसीचे दीड लाख डोस भारतात पाेहोचले आहेत. मात्र अजूनही लस बाजारात यायला आठ ते दहा दिवस लागतील. तिच्या एका डोसची भारतातील किंमत ३०० ते ६०० रुपयांदरम्यान असू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार स्पुटनिक-व्हीचे नमुने तपासणीसाठी हिमाचल प्रदेशातील कसौली येथील केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी कमीत कमी आठ दिवस तरी लागतील. तपासणीत पात्र ठरल्यानंतर ती खुल्या बाजारात विकण्याची परवानगी दिली जाईल. आतापर्यंतच्या माहितीनुसार स्पुटनिक- व्ही लस केंद्र किंवा राज्य सरकारच्या वतीने खरेदी करण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...