आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • S Jaishankar | India Australia (Ind Vs AUS) Meeting Update; S Jaishankar, Rajnath Singh Marise Payne; News And Live Updates

भारत-ऑस्ट्रेलिया 2+2 बैठक:राजनाथ सिंह आणि एस जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची घेतली भेट, अमेरिकेन नेते मोदींशी फोनवर साधणार संवाद

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय आहे 2+2 बैठक?

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये आज 2+2 बैठक झाली. दरम्यान, या बैठकीमध्ये भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियन समकक्ष मंत्री पीटर डटन आणि मेरीस पेन यांची भेट घेतली. चारही नेत्यांनी या भेटीमध्ये दोन्ही देशातील आर्थिक मुद्दे आणि सायबर सुरक्षा यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ही बैठक दोन्ही देशांसाठी महत्वाची मानली जात आहे.

ऑस्ट्रेलियन मंत्री मेरीस पेन संरक्षण मंत्री पीटर डटन यांच्यासोबत भारतात दौऱ्यावर आहेत. दरम्यान, पीटर डटन हे आज भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतील. यानंतर, ऑस्ट्रेलियाचे दोन्ही मंत्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या निवासस्थानी फोनवर संवाद साधणार आहेत.

काय आहे 2+2 बैठक?
दोन देशांच्या दोन मंत्र्यांच्या बैठकीच्या या संकल्पनेला 2+2 बैठक म्हणतात. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशातील ही पहिलीच बैठक असल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यादरम्यान, ऑस्ट्रेलिया आपल्या प्रादेशिक भागीदारांना भेटणार आहे. भारतीय दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियन मंत्री इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेचा दौरा करणार आहेत. या भेटीमध्ये इंडो-पॅसिफिक प्रदेशात स्थिरता राखण्यासाठी चर्चा करणार असल्याचे ही सांगितले जात आहे.

इंडो-पॅसिफिक क्षेत्राची सुरक्षा, स्थिरता आणि समृद्धी यावर चर्चा
ऑस्ट्रेलियन परराष्ट्र मंत्री मारीस पेन म्हणाले होते की, इंडो-पॅसिफिक प्रदेश सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यानची बैठक महत्वाची मानली जात आहे. ही बैठक दोन्ही देशांच्या धोरणात्मक रणनीतीसाठी एक मोठी पायरी आहे असेही पेन म्हणाले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सध्या सर्वोत्तम असल्याचे ही म्हणाले. या बैठकीत पेन आणि जयशंकर यांनी आर्थिक मुद्दे, सायबर सुरक्षा, हवामान बदल, अत्यावश्यक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी यावर चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...