आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की जग सध्या महामारी आणि फेक न्यूज या दोन गोष्टींचा सामना करत आहे. आज आपण बदलाच्या वळणावर उभे आहोत. साथीच्या रोगाने जगातील आर्थिक यंत्रणा उध्वस्त केली आहे. यासोबतच 40 हजार लोकांचा बळी घेतला आहे. याचा परिणाम आपल्या राहण्याच्या, काम करण्याच्या, प्रवास करण्याच्या आणि एकमेकांशी असणार्या संबंधांवरही झाला आहे.
शुक्रवारी अलायन्स ऑफ बहुपक्षीयतेच्या व्हर्चुअल मंत्री बैठकीत जयशंकर यांनी हे भाष्य केलं. हे अलायन्स जगातील स्थिरता आणि शांततेच्या उपायांसाठी समविचारी देशांची संघटना आहे.
फेक न्यूजमुळे परस्पर संभाषणात शंका वाढली'
परराष्ट्रमंत्र्यांनुसार, कोरोनाने आपली जीवनशैली कायमची बदलली आहे. इतरांच्या उपस्थितीत आफला कम्फर्ट लेव्हल कमी झाला आहे. फेक न्यूज, चुकीची माहिती आणि मुद्दामुन पसरवली जाणाऱ्या खोट्या बातम्यामुळे परस्पर संभाषणात शंका वाढली आहे.
राजकारण बाजुला ठेवून तथ्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे
परराष्ट्रमंत्री जयशंकर प्रसाद म्हणाले की, वैज्ञानिक दृष्टिकोनावर अधिक अवलंबून राहण्याची गरज आहे. म्हणजेच आपण राजकारण बाजुला सारुन वस्तुस्थितीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मग कोरोनापासून सुटका मिळवायची असो किंवा भविष्यात महामारीचा सामना करण्याच्या तयारीचा मुद्दा असो. हे दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्री म्हटमाले की, आपल्या पार्टनरशिपमध्ये आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. विश्वास आणि सहकार्यामुळे संकटाच्या वेळी लोक, समाज आणि देश संकट काळात एकत्र उभे असतात. विशेषत: फेक न्यूज आणि आजारपणामुळे आयसोलेशन वाढत असताना विश्वास खूप महत्वाचा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.