आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • S Jaishankar Update | RIC (Russia India China) Trilateral Meeting Today Latest News Updates; S Jaishankar, Wang Y And Sergey Lavrov

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशियाचा मध्यस्थीस नकार:भारत आणि चीनला बाह्य मदतीची गरज नाही, दोन्ही देश चर्चा आपसात चर्चा करून वाद मिटवू शकतात; रशियाची स्पष्टोक्ती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो) - Divya Marathi
(फाइल फोटो)
  • भारत, चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची व्हर्चुअल बैठक; राजनाथ सिंह रशियात

भारत, चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मंगळवारी व्हर्चुअल बैठक घेतली. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारत आणि चीनमध्ये लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर झालेल्या हिंसाचारानंतर ही परराष्ट्र मंत्र्यांमध्ये पहिलीच व्हर्चुअल मीटिंग होती. परंतु, यामध्ये हा वाद चर्चेचा प्रमुख मुद्दा नव्हता. या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर्मनीच्या नाझींविरुद्धच्या लढ्यात रशियाच्या विजयाला 75 वर्षे पूर्ण झाली. त्यावर या व्हर्चुअल बैठकीत चर्चा करण्यात आली. याच बैठकीत इतर मुद्दे सुद्धा उपस्थित करण्यात आले. चर्चा सुरू असताना भारत आणि चीनच्या वादाचा मुद्दा निघाला. परंतु, रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या वादात उडी घेणार नसल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले.

बैठकीत सहभागी झालेले रशियाचे परराष्ट्र मंत्री सेरजी लावरोव्ह यांनी भारत चीनच्या वादापासून अलिप्त राहणेच पसंत केले. रशियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, "भारत आणि चीनला बाह्य मदतीची गरज नाही. देशाचा मुद्दा असल्यास त्यांना कुणाचीही गरज नाही. नुकतेच झालेल्या घडामोडी पाहता मला वाटते की भारत आणि चीन हा मुद्दा आपसात चर्चा करून सोडवतील." दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या दावेदारीला रशियाने समर्थन दर्शवले आहे. भारत सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होऊ शकतो. भारत एक मजबूत उमेदवार आहे आणि आमचे त्याला समर्थन आहे असे लावरोव्ह म्हणाले आहेत.

हिंसाचाराच्या तिसऱ्या दिवशी झाली होती भारत चीनमध्ये चर्चा

15 जून रोजी गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसाचार झाला. त्यामध्ये भारताच्या कमांडिंग ऑफिसरसह 20 जवान शहीद झाले. या घटनेच्या दोन दिवसांनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपले चिनी समकक्ष वांग यी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. भारत आणि चीनचा वाद होण्यापूर्वीच भारत, रशिया आणि चीन (आरआयसी) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या व्हर्चुअल मीटिंगचे नियोजन झाले होते. परंतु, वाद पाहता भारत आणि चीनचे मंत्री यात सहभागी होतात की नाही यावर संभ्रम होता तोच मंगळवारी दूर झाला.

संरक्षण मंत्री तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोमवारी रात्री उशीरा रशियात दाखल झाले. ते तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, ते रशियाच्या संरक्षण मंत्र्यांसह महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. या दौऱ्यात भारत आणि रशिया संबंध तसेच भारताला रशियाकडून मिळणाऱ्या शस्त्र आणि लष्करी उपकरणांवर भर दिला जाणार आहे. याच दरम्यान संरक्षण मंत्री 24 जून रोजी होणाऱ्या रशियाच्या 75 व्या व्हिक्ट्री डे परेडमध्ये सुद्धा सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फेंग सुद्धा उपस्थित राहतील.

बातम्या आणखी आहेत...