आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या लॉरेन्स गँगनेच केली आहे. गँगस्टर लॉरेन्सचा भाचा सचिन बिश्नोईने आपणच हा खून केल्याची कबुली दिली आहे. तो म्हणाला -मी स्वतः सिद्धू मुसेवालाला गोळ्या घातल्या. याद्वारे आम्ही मोहालीत झालेल्या विक्की मिड्डूखेडाच्या हत्येचा बदला घेतला.
स्वतःची ओळख सचिन बिश्नोई म्हणून करवून देणाऱ्या एका व्यक्तीने एका वृत्तवाहिनीशी व्हर्च्युअल ID च्या माध्यमातून संवाद साधताना हा दावा केला. तो सचिन बिश्नोई असल्याची पुष्टी अद्याप झाली नाही.
हत्येचा दावा करणाऱ्याचे संपूर्ण संभाषण
धमकी देणाऱ्यांनी कुठे यायचे ते सांगावे?
सचिनने सांगितले की, आम्हाला अनेकजण धमक्या देत आहेत. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा बदला घेण्याची भाषा करत आहेत. त्यांनी कुठे यायचे ते सांगावे. गरजणारे बरसत नाहीत.
यावेळी सचिनला त्याच्या पुढच्या टार्गेटविषयी विचारले असता त्याने वेळ आल्यावर ते कळेल असे स्पष्ट केले. त्यांनी 2 दिवसांत मनकीरत औलखला मारण्याची वल्गना केली होती. पण, काहीच करता आले नाही. या धमकी देणाऱ्यांतूनच एखादा मरेल, असे तो म्हणाला.
एन्काउंटरला घाबरणाऱ्या लॉरेन्सला पंजाबमध्ये यावेच लागेल, याचिका रद्दबातल
गँगस्टर लॉरेन्सला पंजाब व हरयाणा हाय कोर्टाने जोरदार झटका दिला आहे. त्याची प्रोडक्शन वॉरंटवर पंजाबला वर्ग न करण्याची याचिका हाय कोर्टाने फेटाळून लावली आहे. लॉरेन्सने आपल्या याचिकेत पंजाब पोलिसांकडून आपले एन्काउंटर होण्याची भीती व्यक्त केली होती. हाय कोर्टातील सुनावणीत पंजाबचे महाधिवक्ते म्हणाले होते की, लॉरेन्सचे नाव एफआयआरमध्ये नाही. तसेच पंजाब पोलिसांनीही त्याची कोठडी मागितली नाही. त्यावर हाय कोर्टाने लॉरेन्सची याचिका मॅच्युअर नसल्याचे स्पष्ट करत फेटाळून लावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.