आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sachin Pilot And Rahul Gandhi Meet A Month Later, Reconciliation Efforts Begin From The High Command

राजस्थान:सचिन पायलट आणि राहुल गांधींची एका महिन्यानंतर भेट, हाय कमांडकडून सामंजस्याचे प्रयत्न सुरू

जयपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 जुलैपासून मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात तनाव सुरू आहे

राजस्थानमध्ये 14 ऑगस्टपासून विधानसभेचे सत्र सुरू होणार आहे. यापूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, सचिन पायलट आणि राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, या भेटीसाठी हाय कमांडने पुढाकार घेतला आहे. पायलट गटाचे आमदार आधीपासून सांगत आहेत की, आमची नाराजी पक्षाशी नसून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी आहे. काही काँग्रेस नेत्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, पायलट अनेक दिवसांपासून राहुल गांधींच्या संपर्कात आहेत. पक्षाने विश्वास दिला आहे की, राजस्थानमधील राजकीय संकट लवकर संपेल.

भाजपने 11 ऑगस्टला आमदारांची बैठक बोलावली

यादरम्यान, भाजपने 11 ऑगस्टला आमदारांची बैठक बोलावली आहे. गुजरातला गेलेल्या आपल्या 18 आमदारांना परत बोलवले जाईल. मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता जयपूरच्या हॉटेल क्राउन प्लाजामध्ये ही बैठक होईल.

बातम्या आणखी आहेत...