आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sachin Pilot Ashok Gehlot | Pilot On PM Narendra Modi And Ghulam Nabi Azad I Latest News And Update  

गेहलोतांची स्तुती; पायलटांचा संताप:म्हणाले- श्रेष्ठींनी बंडखोरांवर त्वरीत कारवाई करावी, CM म्हणाले-असे विधान करू नये

जयपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. काल पंतप्रधान मोदींनी गेहलोत यांची ज्या प्रकारे स्तुती केली, त्यावरून पायलट यांनी तर मोदींनी गुलाम नबी आझाद यांचीही तशीच स्तुती केली होती, नंतर काय झाले हे सर्वांना माहित आहेच ना, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, सचिन पायलट यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना CM अशोक गेहलोत यांनी पायलट यांना सल्ला दिला. ते म्हणाले की, पायलट यांनी अशी विधाने करू नयेत.

सचिन पायलट म्हणाले की, काल पंतप्रधानांनी गेहलोतांची जी स्तुती केली, मला वाटते की, कालची घटना एक अतिशय मनोरंजक डेव्हलपमेंट म्हणावी लागेल. अशाच प्रकारे पंतप्रधानांनी संसदेत गुलाब नबी आझाद यांचे कौतुक केले होते. त्यानंतर काय झाले ते आपण सर्वांनी पाहीलेले आहे. या घटनेला इतके हलक्यात घेतले जाऊ नये. पायलट यांनी असे वक्तव्य केल्याने गेहलोत यांना अप्रत्यक्षपणे निशाना साधला आहे.

शिस्त मोडणाऱ्या तीन नेत्यांवर कारवाई होईल
सचिन पायलट म्हणाले की, 3 जणांना नोटिसा दिल्या होत्या. नोटीसनंतर उत्तरे देण्यात आल्याचे समोर आले आहे. आमचा पक्ष शिस्तप्रिय असल्याने या पक्षात आम्हा सर्वांसाठी नियम आणि कायदे समान आहेत. सूचना देऊनही जलद निर्णय घ्यावा, कायदा, शिस्त सर्वांना लागू आहे. खरगे यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला आहे. त्यामुळे असे होऊ शकत नाही की, या ठिकाणी अनुशासनाचा विचार केला गेला नाही.त्यावर कडक निर्णय घेतले जातील.

केसी वेणुगोपाल म्हणाले होते लवकरच निर्णय घेऊ
मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेवर सचिन पायलट यांनी मौन तोडले आहे. पायलट म्हणाले की, केसी वेणुगोपाल म्हणाले होते की यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. आम्ही सर्वजण निवडणुकीमध्ये व्यस्त आहोत. लवकरच गुजरात निवडणुकीची घोषणाही होणार आहे. शिस्तीची बाबही वेणुगोपाल यांच्या निदर्शनास आहे. ही राजस्थानमधील अनुशासनहीन बाब आहे. त्यावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल, अशी आशा पायलट यांनी व्यक्त केली.

कोणाला कोणत्या पदावर बसवायचे हे हायकमांड ठरवेल
सचिन पायलट म्हणाले - कोणत्या पदावर कोणाला बसायचे, कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णयही एआयसीसी घेईल. निवडणुकीला अवघे 13 महिने उरले आहेत. जे काही निर्णय घ्यावे लागतील, पावले उचलावी लागतील, ती कार्यवाही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या स्वरूपातही होऊ शकली नाही. सद्या निवडणुका सुरू आहेत. महत्त्वाच्या निवडणुका आहेत. दोन्ही राज्यात आम्ही जिंकत आहोत. ​​​​​​

मोदी-गेहलोत यांची एकांतात भेट झाली
काल बांसवाडा येथील मानगड धाम येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पीएम मोदी एकाच मंचावर आले होते. कालच, पंतप्रधान मोदींनी सीएम गेहलोत हे मुख्यमंत्र्यांमध्ये एक वरिष्ठ म्हणून कौतुक केले होते. सीएम गेहलोत आणि पीएम मोदी यांची काल मानगडमध्ये सुमारे 10 मिनिटे खाजगी चर्चा झाली. पीएम मादी म्हणाले होते- अशोक गेहलोत आमचे ज्येष्ठ मुख्यमंत्री आहेत. आम्ही एकत्र काम केले आहे.

आता तणाव वाढण्याची शक्यता
सचिन पायलटने पहिल्यांदाच अशोक गेहलोत यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. आतापर्यंत केवळ पायलट समर्थकच गेहलोत यांना घेराव घालत होते. आज पहिल्यांदा सचिन पायलट यांनी त्यांची तुलना गुलाम नबी आझाद यांच्याशी केली. सचिन पायलट यांच्या या वक्तव्यावरून आता काँग्रेसमधील धुसफूस आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय गोंधळाला जबाबदार असलेल्या नेत्यांवर कारवाईची प्रतीक्षा असताना हे वक्तव्य करण्यात आले आहे.

पायलटांनी असे वक्तव्य का केले?
सचिन पायलटच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. गेहलोत यांच्यावर थेट हल्लाबोल केल्यानंतर आता भाषणबाजीचा फेरा अधिक तीव्र होणार आहे. सचिन पायलटच्या वक्तव्यामागे मोठे राजकीय कारण असू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. राजस्थानमधील सत्ता-संघटनेत होत असलेल्या बदलांच्या संदर्भात हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला करण्यामागे आतापर्यंत मौन बाळगणाऱ्या पायलटचे कारण असल्याचे मानले जात आहे. आधी त्यांना हायकमांडकडून मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत मिळायला हवेत. दुसरे, ते दबावाचे राजकारण करत असावेत.

बातम्या आणखी आहेत...