आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sachin Pilot BJP Joining Update | Ex Deputy CM And Rajasthan Congress President Sachin Pilot On Ashok Gehlot

मुलाखत:मी भाजपमध्ये जाणार नाही, राजद्रोहाच्या नोटीसमुळे स्वाभीमान दुखावला गेला; बडतर्फीनंतर सचिन पायलट यांची पहिली मुलाखत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गहलोत वसुंधरा यांच्याच मार्गावर; अधिकाऱ्यांना सांगितले होते, पायलट यांची कामे करू नका
  • 6 महिन्यांपासून माझी आणि ज्योतिरादित्य यांची भेट झालेली नाही, भेटीचा दावा खोटा
  • सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी संपर्क नाही, केवळ प्रियंका गांधी यांच्याशी बोललो

राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय भूकंपाच्या 5 दिवसांनंतर अखेर सचिन पायलट यांनी मौन सोडले. त्यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत देताना, आपण भाजपमध्ये जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. मी भाजपच्या कुठल्याही नेत्याची भेट घेतलेली नाही. सोबतच, ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतल्याचा दावा सुद्धा खोटा आहे. गेल्या 6 महिन्यांपासून आमची भेट झालेली नाही. मी यावेळी केवळ इतकेच बोलू शकतो की मी माझ्या लोकांसाठी काम सुरूच ठेवणार आहे. राज्यातील पोलिसांनी मला राजद्रोहाची नोटीस बजावली. या नोटीसमुळे माझा स्वाभीमान दुखावला असे पायलट म्हणाले आहेत.

केवळ प्रियंका गांधींशी बोललो

सचिन पायलट पुढे बोलताना म्हणाले की काँग्रेसमधून त्यांच्याशी कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी किंवा राहुल गांधी बोललेले नाहीत. प्रियंका गांधी यांच्याशी केवळ फोनवर चर्चा झाली. ही चर्चा सुद्धा वैयक्तिक स्वरुपाची होती.

मी राजद्रोह कायद्याचा विरोधी आणि माझ्यावरच झाला वापर

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जारी केलेल्या जाहीरनाम्याची आठवण यावेळी पायलट यांनी करून दिली. या जाहीरनाम्यात आम्ही (काँग्रेस) राजद्रोह कायद्याला विरोध केला होता. आणि विरोधाभास पाहा की काँग्रेस सरकारने माझ्याच विरोधात या कायद्याचा वापर केला आहे. माझे हे पाउल अन्यायाच्या विरोधात होते.

मला सत्तेची किंवा कुठल्याही पदाची हौस नाही

मला मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर राग नाही. मला सत्तेची किंवा कुठल्याही पदाची हौस नाही. आम्ही बेकायदा उत्खनन विरोधात आवाज उठवला होता. वसुंधरा राजे यांची सत्ता असताना सरकारवर बेकायदा खाणकामाचे करार रद्द करण्यास दबाव टाकला होता. माझी अपेक्षा फक्त एवढीच होती की आपण जनतेला दिलेली आश्वासने सत्तेवर आल्यानंतर पूर्ण करावी. परंतु, गहलोत यांनी असे काहीच केले नाही. ते सुद्धा वसुंधरा यांच्या मार्गावर होते.

अधिकाऱ्यांना सांगितले होते माझे ऐकायचे नाही

मला राजस्थानच्या विकासासाठी काम करण्याची परवानगी नव्हती. अधिकाऱ्यांना तर हेही सांगण्यात आले होते की मी सांगितलेली कामे करू नये. मागितलेल्या फायली माझ्याकडे देण्यात आल्या नाहीत. कित्येक महिने कॅबिनेटच्या बैठका सुद्धा होत नव्हत्या. अशा पदाचे काय करणार की ज्यातून लोकांची कामे सुद्धा करता येणार नाहीत. मी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे चर्चा देखील केली होती. स्वतः गहलोत यांच्याशी संवाद साधला. परंतु, बैठका होतच नव्हत्या.

बातम्या आणखी आहेत...