आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायलटांची घरवापसी:राजस्थानातील 32 दिवसांचे राजकीय नाट्य संपुष्टात, राहुल व प्रियंकांनी वळवले पायलटांचे मन

नवी दिल्ली/जयपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पायलटांचा गहलाेतांना टोला- राजकारणामध्ये वैयक्तिक द्वेष नको, विनम्र असावे

राजस्थानातील ३२ दिवसांपासूनचे राजकीय नाट्य सोमवारी शेवटाकडे जाताना दिसले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधींना भेटल्यानंतर बंडखोर नेते सचिन पायलट व त्यांच्या १८ आमदारांनी तलवार म्यान केली. त्यांनी काँग्रेस व राजस्थान सरकारच्या हितार्थ कटिबद्धता व्यक्त केल्याचे पक्षाने सांगितले. दुसरीकडे, अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी राजस्थानचे सीएम अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. रात्री साडेदहा वाजता प्रियंका व इतर ज्येष्ठ नेत्यांसोबत वॉर रूममधील बैठकीनंतर पायलट म्हणाले, ‘मला पदाची लालसा नाही. पक्ष पद देतो, ते परतही घेऊ शकतो. आमचा लढा आदर्शांसाठी होता. पक्षहितार्थ मुद्दे उपस्थित करणे गरजेचे आहे. सोनियाजींनी ते ऐकून घेतले आहेत. त्यांच्यावर तोडगाही निघेल.’

गहलोत यांच्या रोखाने पायलट म्हणाले, ‘माझ्यावर खूप वैयक्तिक शेरेबाजी झाली. मात्र, राजकारणात वैयक्तिक द्वेषाला स्थान नाही. विनम्र असले पाहिजे. मी कधीही आक्षेपार्ह भाषा वापरली नाही.’ काही दिवसांपूर्वी गहलोत यांनी पायलट यांना निकामी व निरुपयोगी असे संबोधले होते.

समझोत्याची ब्ल्यूप्रिंट : सरकारवर नजर ठेवण्यासाठी समिती
पायलट दोन्ही पदांवर परतणार :
राहुल यांनी पायलटांना उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षपदावर परतण्यास सांगितले आहे. सूत्रांनुसार, राहुल यांनी त्यांची प्रत्येक तक्रार साेडवण्याचा शब्द दिला आहे.

समिती चालवेल सरकार : पक्षश्रेष्ठींनी सरकार चालवण्यासाठी ३ सदस्यीय समिती स्थापली आहे. तिचे मॉनिटरिंग राहुल-प्रियंका करतील. ही समिती पायलटांचे प्रश्न सोडवण्याचेही काम करतील.

मुख्यमंत्रिपदी गहलोतच : गहलोत हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असे समझोत्यात ठरले. तथापि, गहलोतांना मुख्यमंत्रिपदवरून हटवणे हीच पायलट गटाच्या बंडाळीमागील मुख्य मागणी होती.

बंडोबांवर कारवाई नाही : पायलट आणि त्यांच्यासोबत गेलेल्या १८ आमदारांवर कोणतीही कारवाई होणार नाही. ज्यांचे पदे गेली त्यांच्यासोबतच इतरांनाही सन्मानजनक पद देण्याची चर्चा आहे.

मात्र भाजपचा दावा... आज नाही तर उद्या गहलोत सरकार कोसळणे निश्चित
काँग्रेसमध्ये समेटाचे संकेत असताना भाजप विविध पर्यायांवर काथ्याकूट करत आहे. भाजप नेते गुलाबचंद कटारिया म्हणाले, काँग्रेसमध्ये एकजूट असली तरी ती तात्पुरती आहे. सरकार आज नाही तर उद्या कोसळेलच. मंगळवारी भाजप आमदारांची बैठक आहे. यात माजी सीएम वसुंधराराजेही सहभागी होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...