आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजस्थान राजकारण:सचिन पायलट हे कुचकामी : मुख्यमंत्री अशोक गहलोत, मुस्कटदाबीचा प्रयत्न : पायलट

जयपूर/ नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा माजी उपमुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला

पायलट हे निरुपयोगी, कुचकामी व विश्वासघातकी आहेत, अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, सचिन पायलट म्हणाले की, ‘माझे प्रतिमाहनन तसेच मुस्कटदाबीचा प्रयत्न होत आहे.’ तथापि, पायलट यांचे हे वक्तव्य थेट गहलोत यांच्याविरुद्ध नव्हते. आमदाराला ३५ कोटींची ऑफर दिल्याच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी पायलट यांनी हे निवेदन जारी केले.

गहलोत म्हणाले : पायलट यांच्यासोबतचे आमदार ओलीस, त्यांचे मोबाइलही हिसकावून घेण्यात आले गेल्या ७ वर्षांत राजस्थान हे एकमेव राज्य आहे, जेथे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी झाली नाही. इंग्रजी व हिंदीवर प्रभुत्व आणि निरागस चेहऱ्याच्या पायलटने मीडियावर प्रभाव टाकला. ते भाजपसोबत ६ महिन्यांपासून कट रचत होते.त्यांच्या गटातील आमदारांना ओलीस ठेवलेले असून मोबाइलही हिसकावून घेतले आहेत. वकिलांना ५० लाख रुपये देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे कुठून येतात, असा सवालही गहलोत यांनी केला.

केंद्रीय मंत्री शेखावत यांना एसओजीची नोटीस
काँग्रेस आमदारांच्या घोडेबाजाराचा तपास करत असलेल्या राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (एसओजी) केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना नोटीस बजावली आहे. त्यांना आवाजाचा नमुना व जबाब नाेंदवण्यात सांगितले आहे.

आज पायलट गटाच्या याचिकेवर सुनावणी
जयपूर | राजस्थान विधानसभेच्या सभापतींकडून जारी अपात्रतेच्या नाेटिशीविरुद्ध सचिन पायलट गटाच्या याचिकेवर सोमवारची सुनावणी अर्धवट राहिली. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता ती पुन्हा सुरू होईल. मंगळवारीच निकालही येण्याची शक्यता आहे.