आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sachin Pilot Protest Against Ashok Gehlot; Vasundhara Raje | Rajasthan | Ashok Gehlot

उठाव:आपल्याच सरकारच्या विरोधात उपोषण करणार सचिन पायलट; गेहलोतांची भाषणे मीडियाला दाखवली, म्हणाले- लोकांचा विश्वास उडेल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन पायलट यांनी रविवारी जयपूरच्या घरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराच्या चौकशीशी संबंधित सीएम गेहलोत यांची काही व्हिडिओ माध्यमांना दाखवली.  - Divya Marathi
सचिन पायलट यांनी रविवारी जयपूरच्या घरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराच्या चौकशीशी संबंधित सीएम गेहलोत यांची काही व्हिडिओ माध्यमांना दाखवली. 

राजस्थानमध्ये कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाच्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पायलट यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले- 'मी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात तक्रार केली होती, परंतु गेहलोत यांनी कोणतीही कारवाई केली नाही. याच्या निषेधार्थ पायलट आता 11 एप्रिल रोजी जयपूर येथील हुतात्मा स्मारकारवर उपोषण करणार आहेत.

पायलट म्हणाले, "वसुंधरा सरकारमध्ये भ्रष्टाचारावर कोणतीही कारवाई झाली नाही. विरोधी पक्षात असताना आम्ही चौकशी केली जाईल, असे आश्वासन लोकांना दिले होते. निवडणुकीला 6-7 महिने बाकी आहेत, विरोधक संभ्रम पसरवू शकतात. काही मिलीभगत तर नाही ना. हे सिद्ध करण्यासाठी लवकरच कारवाई करावी लागेल. जेणेकरून आमच्या बोलण्यात आणि वागण्याक कोणताही फरक दिसणार नाही, असे सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांना वाटते, असे सचिन पायलट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मोठे अपडेट : सचिन पायलट यांनी उपोषणाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत राजस्थान विद्यापीठात एनएसयूआयच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. त्यात आता सीएम गेहलोत ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

45 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा उपस्थित- पायलट
सचिन पायलट यांनी जयपूर येथील घरी पत्रकार परिषद बोलावली होती. ते म्हणाले, “वसुंधरा सरकारच्या काळात विरोधी पक्षात असताना आम्ही 45 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांबाबत आवाज उठवला होता आणि सरकार या घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींना शिक्षा करेल, असे आश्वासन दिले होते.

मी कधीही द्वेषपूर्ण कारवाई केली जावी, अशी मागणी केलेली नाही. परंतु विरोधक म्हणून आम्ही जी विश्वासार्हता निर्माण केली आहे ती कायम ठेवली पाहिजे. मी सीएम गेहलोत यांना विनंती केली होती. पहिले पत्र 28 मार्च 2022 रोजी लिहिले होते. त्यावर उत्तर मिळाले नाही. मग दुसरे पत्र लिहिले. त्यालाही उत्तर मिळाले नाही.

केंद्र सरकार गेल्या काही काळापासून विरोधी पक्षांच्या लोकांना लक्ष्य करत आहे. ईडीच्या नोटिसा किंवा छापे टाकण्यात आलेल्या नेत्यांपैकी 95 टक्के नेते विरोधी पक्षाचे आहेत.

लोकांचा निवडणुकीत विश्वास, म्हणून हे कृत्य
सचिन पायलट म्हणाले- 'काय कारण आहे की वारंवार सत्तेत येऊनही आम्ही विरोधी पक्षात असताना केलेल्या आरोपांवर कोणतीही कारवाई करत नाही. जेव्हा आपण पुन्हा निवडणुकीला सामोरे जातो. तेव्हा कोणीतरी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे, म्हणून आपण काहीतरी कृती करणे गरजेचे आहे. असे पायलट यांनी स्पष्ट केले.

अशोक गेहलोत आणि मी एकत्र आरोप केले होते, जोपर्यंत निष्पक्ष तपास होत नाही तोपर्यंत कसे कळणार. तपासात कोणीही दोषी नसल्याचं समोर आलं, तर गेहलोतजी आणि मी खोटे बोललो हे आम्ही मान्य करू. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत लोक आपल्यावर केलेले आरोप खरे की खोटे यावर विश्वास कसा ठेवणार? असा प्रश्न उपस्थित केला.

हे ही वाचा

काळ आला, पण...VIDEO:सचिन पायलटांच्या अंगावर पडली जळती मशाल; युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हातातून निसटली

त्याचे झाले असे की, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री तथा कॉंग्रेस नेते सचिन पायलट हे मशाल मोर्चात सहभागी झाले होते. तेव्हा प्रत्येकाच्या हाती मशाल होती. दरम्यान, मोर्चातून जात असताना अचानक पायलट यांच्या अंगावर जळती मशाल पडली. - येथे वाचा संपूर्ण बातमी