आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sachin Pilot Removed From Rajasthan Deputy CM Post And Story Repeated Like Jyotiraditya Scindia In MP And Rahul Gandhi Didn't Intervene In Both Cases

काँग्रेसमधून भुर्र उडाले 'पायलट':ना ज्योतिरादित्यांना थांबवले ना पायलट यांचे वळवू शकले मन; युवा चेहऱ्यांनी सोडला पक्ष आणि केवळ ट्विट करत राहिले राहुल-प्रियंका

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी काँग्रेस नेते सचिन पायलट यांची राजस्थान प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदावरुन हकालपट्टी करण्यात आली
  • पदावरुन हटवल्यानंतर 15 मिनिटांच्या आत पायलट यांनी लिहिले - सत्य परेशान किया जा सकता है, पराजित नही

मंगळवार, 14 जुलै 2020 ला तेच सर्व झालं, जसं मंगळवार 10 मार्च 2020 ला झालं होतं. काँग्रेस लीडरशिपने 14 जुलैला राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांना पदावरुन काढले, तर 10 मार्चला  ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसपासून विभक्त झाले.

मंगळवारचा दिवस तर फक्त एक योगायोग आहे, पण काँग्रेसचे मंगल करणारे तरुण नेते पक्ष सोडून जात असताना, ज्या तरुण लीडरशिपवर पक्षाचे सर्वस्व पणाला लागले आहे, ते इकडच्या-तिकडच्या गोष्टी करुन गोंधळात पडत आहेत.

येथे बोलले जातेय राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा-गांधी यांच्याविषयी. या दोघांच्या शपथा घेतल्या जातात आणि त्यांच्या जोडीवरच पक्षाचे भविष्य टिकून असल्याचे बोलले जाते. तथापि, 11 ते 14 जुलै या कालावधीत चर्चेत असलेल्या राजस्थानच्या राजकारणात एक नवीन वळण आले आहे आणि हे वळण पुन्हा कॉंग्रेसला मोठा धक्का देणार आहे. या धक्क्याचा परिणाम आगामी काळात कळेलच, त्याआधी, 19 महिन्यांपूर्वीचे दोन फोटो पाहा, ज्यांच्या केंद्रस्थानी राहुल गांधी स्वत: आहेत आणि दोन राज्यांमध्ये दोन न जुळणार्‍या जोडप्यांना एकत्र आणण्याचे श्रेयही त्यांच्या खात्यावर गेले होते.

पहिल्या फोटोची साक्ष: 13 डिसेंबर 2018 ला या फोटोद्वारे राहुल गांधींनी मध्य प्रदेशात नवीन फॉर्म्यूला देऊन, एक नवीन जोडी तयार केली होती. जगासमोर महान तत्त्ववेत्ता लिओ टॉल्स्टॉय यांचा संदेश पुन्हा सांगताना ते म्हणाले होते- सयंम आणि काळ हा दोन सर्वात शक्तिशाली योद्धा आहेत.

पहिल्या फोटोचा परिणाम: सयंम आणि काळ हातातून निघून गेले आणि मार्च 2020 मध्ये ही जोडी तुटली. होळीच्या दिवशी मन जुळले नाही, पण जोडी तुटली आणि सोबत मध्यप्रदेशातील सरकार कोसळून गेली. राहुल गांधी त्यावेळसही काही बोलले नव्हते. राहुल आणि प्रियंका, होळीच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त होते, पण ज्योतिरादित्य यांना थांबवण्यात अयशस्वी झाले.

दुसऱ्या फोटोची साक्ष: कमलनाथ आणि शिंदे यांच्यासोबत काढलेल्या फोटोच्या दुसऱ्या दिवशी राहुल यांनी त्याच अंदाजात गहलोत आणि पायलट  यांच्यासोबतच फोटो शेअर केला होता. दोन नेते एकत्र आणण्यात आले आणि संदेश देण्यात आला -' राजस्थानची एकतेमधील रंग - The united colours of Rajasthan!'

दुसऱ्या फोटोचा परिणाम: परिणाम तर अनेक दिवसांपासून दिसत होता, पण राहुल-प्रियंका किंवा सोनिया गांधी या परिस्थितीला सांभाळून घेतील, असे दिसत होते. पण असे झाले नाही. या फोटोतील एकता 2020 मधून संपुष्टात आली. यावेळसही काँग्रेस लीडरशीपने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही आणि पायलट काँग्रेसमधून निघून गेले.

आता पाहूया मागील 4 दिवसांच्या ट्वीट्सची साक्ष , जी सांगते काँग्रेसच्या तरुण लीडरशिपकडे कोराना, चीन वाद, धारावी मॉडल, लोदी रोडचा बंगला आणि श्रद्धांजली देण्याची वेळ आहे, पण आपल्या तरुण साथीदारांना थांबवण्यासाठी वेळ नाही.

11 ते 14 जुलै या काळात राहुल गांधींचे 9 ट्विट : एकाही ट्विटमध्ये राजस्थान किंवा गहलोत-पायलट यांच्याविषयी काही लिहिले नाही 

तारीखराहुल गांधींचे 9 ट्विट आणि त्याचे विषय
14 जुलै  केवळ एक ट्विट , कोरोनावर WHO चा इशारा 
13 जुलै एकूण 3 ट्विट, कोरोनाचे ग्राफ आणि मोदींवर चीनवरुन हल्लाबोल 
12 जुलै  केवळ एक ट्विट, द वायरच्या बातमीवरुन मोदींवर सवाल
11 जुलै  एकूण 3 ट्विट, धारावी मॉडल, मोदींवर टीका आणि रीवा सोलर प्लांट

14 जुलै: 
राजस्थानमधील सचिन पायलट यांना पक्षातून काढून टाकण्याची तयारी सुरू होती आणि राहुल गांधी बीबीसीच्या स्टोरीवर रीट्वीट करून देशातील कोरोनाच्या दहा लाख प्रकरणांचा अंदाज लावत होते. दिवसभर हे त्याचे एकमेव ट्विट आहे.

13 जुलै: कोणत्यातरी बातमीवरुन राहुल गांधी अस्वस्थ झाले. त्यांनी दोन ट्विट करुन मीडियावर आरोप लावला की, ते फासिस्ट ताकदींच्या हातात आहे आणि ते याची पोलखोल करतील. राहुल म्हणाले की मी उद्या म्हणजे 14 जुलैपासून दररोज एक व्हिडिओ पोस्ट करुन आपला मुद्दा मांडेल. कदाचित ते हे लिहिलेले विसरले. ते 14 जुलै रोजी असे काहीही बोलले नाही.

13 जुलै: हिंदूंच्या रिपोर्टचा हवाला देत त्यांनी मोदींना घेरले आणि अस्पष्ट शब्दात मुद्दा मांडला. एवढ्या मोठ्या नेत्याच्या ट्वीटवर वाचकांचा विशेष प्रतिसाद नव्हता.

13 जुलै: जगातील कोरोनाच्या आलेखाचे छायाचित्र पोस्ट करत त्यांनी आपल्या देशातील परिस्थितीवर टीका करत विचारले की, 'आपण कोरोनाशी लढायला चांगल्या स्थितीत आहोत का?'

12 जुलैः द वायर न्यूज पोर्टलमध्ये करण थापरच्या शोची बातमी रीट्विट करत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आणि विचारले की चीनने आपली जमीन कशी घेतली?

11 जुलै: या दिवशी राहुल यांनी 3 ट्विट केले आणि सर्वप्रथम महाराष्ट्रात कोरोना रोखण्याच्या धारावी मॉडेलवरुन आपल्या सरकारचे कौतुक केले आणि जनतेचे कौतुकही केले. परंतु ते विसरले की महाराष्ट्रातील कोरोना झपाट्याने वाढतोय.

11 जुलै: एनडीटीव्हीच्या बातमीवर रीट्वीट करून राहुल यांनी पीएमकेयर्स फंडाशी चीनच्या कनेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी चिनी मोबाईल कंपन्यांची नावेही लिहिली आणि प्रश्न केला की या प्रकरणात काय दडले आहे?

11 जुलै: एनडीटीव्हीच्या बातमीवर रीट्वीट करून राहुल यांनी पीएमकेयर्स फंडाशी चीनच्या कनेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी चिनी मोबाईल कंपन्यांची नावेही लिहिली आणि प्रश्न केला की या प्रकरणात काय दडले आहे?

11 जुलै: PMO कडून मप्रच्या रीवामध्ये सुरू करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे ट्विट रीट्विट करत राहुल गांधींनी केवळ एका शब्दात टीका केली. असत्याग्रही!  ना तो आपला मुद्दा सांगू शकले किंवा असत्य काय तेही सांगू शकले नाही.

11 ते 14 जुलै या काळाच प्रियंका गांधी वाड्रा यांचे 6 ट्विट 

14 जुलै : सचिन पायलट यांना ज्यावेळी दोन्ही पदांवरुन हटवण्यात आले, तेव्हा प्रियंका नेलसन मंडेला यांची धाकटी मुलगी जिंडसीसोबतची आपली मैत्री आठवून त्यांना श्रद्धांजली देत होत्या.

14 जुलै: प्रियंका या आपल्या लोडी इस्टेट येथील घर रिकामे करण्याबद्दल उपहासात्मक शब्दात नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे आभार मानत आहेत. यासोबतच मी बंगल्याविषयी कोणतेही निवेदन दिलेले नाही आणि देणार नाही. जसे मी म्हटले आहे, मी 1 ऑगस्टला हा बंगला रिकामा करणार आहे. 

14 जुलै : मंगळवारी चौथ्या ट्विटमध्ये प्रियंका यांनी यूपीमधील कोरोना स्थितीवर चिंता व्यक्त केली तसेच वाढत्या घटनांमुळे केलेल्या छोट्या लॉकडाऊनला बेबी लॉकडाऊन असे म्हटले. यासोबतच यामागे काही कट असल्याचा इशाराही केला. 

14 जुलै : जेव्हा राजस्थानमध्ये वाईट पद्धतीने लीडरशिपमध्ये वाद सुरू होता. तेव्हा प्रियंका यांनी लोदी इस्टेटच्या बंगल्याविषयी सोशल मीडियावर येत असलेले वृत्त फेक आहे हे सांगण्यात व्यस्त होत्या. 

13 जुलै : प्रियंका गांधींनी दिवसभरात दोन ट्विट केले. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी यूपीमध्ये कोरोनाचे प्रकरणाचे तीन दिवसांचे आकडे सांगत योगींवर एक शेर शेअर करत टीका केली. ‘मर्ज़ बढ़ता गया, ज्यों ज्यों दवा की

13 जुलै : सोमवारच्या दुसऱ्या ट्विटमध्ये प्रियंकाने राहुल गांधींचे ट्विट रीट्विट करत भारतातील कोरोना परिस्थितीवर निशाणा साधला. 

11 आणि 12 जुलै 
प्रियंका गांधींनी कोणते ट्विट केले नाही. दोन्हीही दिवशी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर कोणतीही पोस्ट नव्हती.