आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध:आपल्याच सरकारविरोधात आज सचिन पायलट करणार उपोषण, वसुंधरा सरकारच्या घोटाळ्यांची चौकशीची मागणी

जयपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी निवडणुकीच्या ८ महिने आधी पुन्हा एकदा आपल्याच सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी वसुंधरा सरकारवर झालेल्या आरोपांची चौकशी न केल्याबद्दल सोमवारी हुतात्मा स्मारकावर एकदिवसीय उपोषण करण्याची घोषणा केली.

रविवारी पत्रकारांशी बोलताना पायलट म्हणाले - “ज्या मुद्द्यांवर आम्ही सत्तेत आलो त्यावर मी वर्षभरापूर्वी पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दोनदा पत्रे लिहिली होती. मात्र, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. विरोधी पक्षात असताना चौकशी केली जाईल, असे आश्वासन आम्ही दिले होते. आता वसुंधराराजे आणि अशोक गेहलोत यांच्यात साटेलोटे तर ना नाही, असा संभ्रम विरोधक पसरवू शकतात. तत्पूर्वी पायलट यांनी याआधी गेहलोत यांच्याकडून वसुंधरा सरकारवर केलेल्या आरोपांचे व्हिडिओ दाखवले.

45 हजार कोटींच्या घोटाळ्याची तपासणी - पायलट

सचिन पायलट यांनी जयपूर येथील घरी पत्रकार परिषद बोलावली होती. ते म्हणाले, “वसुंधरा सरकारच्या काळात विरोधी पक्षात असताना आम्ही 45 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांबाबत आवाज उठवला होता आणि सरकार या घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींना शिक्षा करेल, असे आश्वासन दिले होते.

मी कधीही द्वेषपूर्ण कारवाई केली जावी, अशी मागणी केलेली नाही. परंतु विरोधक म्हणून आम्ही जी विश्वासार्हता निर्माण केली आहे ती कायम ठेवली पाहिजे. मी सीएम गेहलोत यांना विनंती केली होती. पहिले पत्र 28 मार्च 2022 रोजी लिहिले होते. त्यावर उत्तर मिळाले नाही. मग दुसरे पत्र लिहिले. त्यालाही उत्तर मिळाले नाही.

केंद्र सरकार गेल्या काही काळापासून विरोधी पक्षांच्या लोकांना लक्ष्य करत आहे. ईडीच्या नोटिसा किंवा छापे टाकण्यात आलेल्या नेत्यांपैकी 95 टक्के नेते विरोधी पक्षाचे आहेत.

लोकांचा निवडणुकीत विश्वास, म्हणून हे कृत्यसचिन पायलट म्हणाले- 'काय कारण आहे की वारंवार सत्तेत येऊनही आम्ही विरोधी पक्षात असताना केलेल्या आरोपांवर कोणतीही कारवाई करत नाही. जेव्हा आपण पुन्हा निवडणुकीला सामोरे जातो. तेव्हा कोणीतरी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे, म्हणून आपण काहीतरी कृती करणे गरजेचे आहे. असे पायलट यांनी स्पष्ट केले.

अशोक गेहलोत आणि मी एकत्र आरोप केले होते, जोपर्यंत निष्पक्ष तपास होत नाही तोपर्यंत कसे कळणार. तपासात कोणीही दोषी नसल्याचं समोर आलं, तर गेहलोतजी आणि मी खोटे बोललो हे आम्ही मान्य करू. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत लोक आपल्यावर केलेले आरोप खरे की खोटे यावर विश्वास कसा ठेवणार? असा प्रश्न उपस्थित केला.