आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजस्थान:'सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नहीं'; काँग्रेसच्या कारवाईनंतर सचिन पायलट यांची प्रतिक्रीया

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सचिन पायलट यांची मंगळवारी प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदावरुन हकालपट्टी करण्यात आली
  • या निर्णयानंतर पायलट यांनी आपल्या ट्विटर बायोमधून उपमुख्यमंत्री आणि इतर माहिती हटवली आहे

राजस्थानात सध्या वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. यादरम्यान, सचिन पायलट यांना मंगळवारी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून काढण्यात आले. पक्षाच्या या निर्णयानंतर पायलट यांची पहिली प्रतिक्रीया आली आहे. सचिन पायलट यांनी आपल्या ट्विटर हँडलवपर एका ट्वीटमध्ये म्हटले की, 'सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नहीं.' सचिन पायलट यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर ही पहिली थेट प्रतिक्रीया आहे. 

सचिन पायलट यांचे ट्वीट

मंगळवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमदारांची दुसरी बैठक बोलवली होती. यापूर्वी सोमवारी काँग्रेसने सचिन पायलट यांना पक्षाने चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिले होते. त्यांना सांगण्यात आले होते की, पक्षाचे दार त्यांसाठी अजूनही खुले आहेत. पण, मंगळवारी(ता.14) झालेल्या बैठकीलाही पायलट उपस्थित झाले नाही. यानंतर बैठकीत सर्वांच्या मागणीनंतर पायलट यांच्यासह त्यांचे समर्थक विश्वेन्द्र सिंह आणि रमेश मीणा यांना हटवले.

पायलट यांनी बायोमधून प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपद हटवले

सचिन पायलट यांना दुपारी 1.45 वाजता राज्याच्या प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात आले. यानंतर 2.45 वाजता पायलट यांनी आपल्या ट्विटर हँडलचा प्रोफाइल बदलला. आधी यावर डिप्यूटी सीएम राजस्थान आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष लिहीले होते. आता या प्रोफाइलवर फक्त टोंक एमएलए, माजी केंद्रीय आयटी मिनिस्टर आणि टेरिटोरियल आर्मीचे कमीशंड अधिकारी, अशी माहिती आहे.

निर्णयानंतर गहलोत यांचा पलटवार

पक्षाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, पहिल्यांदा देश धोक्यात आला आहे. जी सरकार देशात आली आहे, ती पैशांच्या जोरावर दुसऱ्या सरकारांना पाडण्याच्या प्रयत्नात आहे. पुढे ते म्हणाले की, पायलट, भाजपच्या हातात खेळत आहेत. जे लोक मध्यप्रदेशात मॅनेजमेंट करत होते, तेच इथेही काम करत आहेत. त्यांनी रिजॉट आणि सर्वकाही मॅनेज केले आहे, पायलट यांच्या हातात काही नाहीच. भाजप सर्वकाही करत आहे.