आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sachin Tendulkar's Special Discussion With Mothers Around The World Who Leave Home And Face Corona

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदर्स डेनिमित्त विशेष:जगभरात घर-कुटुंब सोडून कोरोनाचा सामना करणाऱ्या मातांसोबत सचिन तेंडुलकरची विशेष चर्चा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कलेक्टर सचिनला म्हणाल्या, माझी मुले आता खेळण्याचा हट्ट करत नाहीत; आयपीएसने सांगितले- समाजाला देण्याचेही कुटुंबाने शिकावे

आज जगभरात विविध व्यवसायांमधील माता घर- कुटुंब सोडून नि:स्वार्थ भावनेने कोविड- १९शी लढत आहेत. यातील अनेकांना तर घरी जायचीही संधी नाही. आज संपूर्ण देश या योद्ध्यांच्या समर्थनार्थ उभा आहे. त्यांच्या त्यागाचे कौतुक करत आहे. आपण त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच. भारतरत्न सचिन तेंडुलकरने मदर्स डेनिमित्त अशा मातांसोबत बातचीत केली. यात जिल्हाधिकारी, एसपी, डॉक्टर्स, नर्स ते समाजसेवक अशा विविध क्षेत्रातील माता आहेत. वाचा ही बातचीत त्यांच्या शब्दांत...

> माझा पहिला प्रश्न वायनाड जिल्हाधिकारी आदिला अब्दुल्ला यांना. तुम्ही तुमचे कुटुंब आणि व्यग्र दिनचर्या यात कसा समन्वय राखता?

आदिला - सुरुवातीला मोठे अवघड गेले. माझी तीन लहान मुले आहेत आणि तिघे साडेसात वर्षापेक्षा कमी आहेत. माझा सर्वात लहान मुलगा दीड वर्षाचा आहे ज्याला मला खाऊ घालायचे असते. या दृष्टीने पाहिले तर मी दोन आघाड्यांवर लढत आहे. एकीकडे हे बघायचे आहे की सर्वसामान्य लोकांमध्ये संसर्ग पसरू नये. तसेच माझ्यामुळे माझी मुले बाधित होऊ नयेत. पहिल्या आठवड्यात तर समन्वय साधणे कठीण गेले. मुलांना त्यांच्या वडिलांकडे सोपवावे लागायचे तर कधी माझ्या आईची मदत घ्यावी लागायची. सुरुवातीला मला माझ्या मुलांना दुपारी केवळ एकदा खाऊ घालता यायचे. मात्र दिवसेंदिवस स्थिती बदलत गेली. माझ्या फोनकॉल्सचाही मुलांना द्वेष वाटू लागला. कोरोनाचाही ते द्वेष करू लागले. मात्र आता गेल्या आठवड्यापासून मी दुपारी ३ तासांची विश्रांती घेत असून मुलांसाेबत वेळ घालवते. रात्री कामावरून परतल्यावर मुलांसाेबत वेळ घालवते. माझ्या मुलांमध्ये बदल दिसत आहे. ते आता क्रेयान्स किंवा खेळण्याचा किंवा मॉलमध्ये जाण्याचा हट्ट करत नाहीत. त्यांना आता केवळ कोरोना लवकर नष्ट व्हावा म्हणजे आपल्या आईसोबत पहिल्यासारखा वेळ घालवता येईल, असे वाटते. आधी त्यांना वाटायचे की त्यांची आई एखाद्या सुपरमॅन किंवा बॅटमॅनसारखी कोरोनाशी लढतेय. आता वाटते की ही स्पायडरमॅन किंवा बॅटमॅनची गोष्ट संपावी.

> सचिन- माझा दुसरा प्रश्न कोचिनच्या पोलिस उपायुक्त जी. पुंगझली यांना आहे. एखादा पोलिस अधिकारी झाल्याचे ऐकून मुलांना बरे वाटते. एक पोलिस अधिकारी आई असल्याने संकटाच्या काळात तुम्ही मुलांना काय संदेश द्याल?

जी पुंगझली - पहिला संदेश प्रत्येक मूल, त्याची आई आणि त्याच्या कुटुंबाला हा असेल की वस्तू देण्याचे शिका म्हणजे जबाबदार नागरीक बनू शकाल. दुसरा संदेश असेल की, त्यांनी चूक करायला घाबरू नये आणि कोणत्याही स्थितीत नवीन शिकण्याचा प्रयत्न करा कारण आयुष्य यश आणि अपयश, दोघांनी मिळून बनते. अशात मुलांना हे शिकवण्याची गरज आहे की त्यांनी आपले अपयश स्वीकारावे आणि त्यातून त्यांना बाहेर कसे पडता येईल. केवळ एक जबाबदार आईच एक जबाबदार मूल घडवू शकते हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. कारण बहुतांशी स्थितीत मुले त्यांच्या आईशी जोडली गेलेली असतात यामुळे आईची जबाबदारी आणखी वाढते की त्यांनी मुलांना शिकवावे की ते समाजात कसे योगदान देऊ शकतात.

> सचिन- माझा तिसरा प्रश्न इंग्लंडमध्ये राहणाऱ्या विधी व्यवसायातील अमृता जयकृष्णन यांना आहे. कोविड १९ मधून जाणे अवघड राहिले असेल. तुम्ही केवळ त्यातून बऱ्याच नाही झाल्या तर कोरोना बाधित रुग्णांची सेवा केली. या काळात तुम्हाला काय वाटले?

अमृता जयकृष्णन- खरे पाहता मी काही हीरो नाही. माझे पती डाॅक्टर आहेत आणि ते इंग्लंडमध्ये संसर्ग पसरायला सुरुवात झाली तेव्हापासून रुग्णांच्या सेवेत आहेत. एक कोविड योद्ध्याची पत्नी असल्याने मी आणि माझे पती दोघेही याबाबत जाणून होतो की या लढाईत धोका किती होऊ शकतो. आम्हाला माहिती होते की तुम्ही कितीही काळजी घ्या तुम्ही बाधित होऊ शकता. आणि जसे अपेक्षित होते त्या प्रमाणे आम्ही दोघेही आजारी पडलो. सुदैवाने आमची लक्षणे सौम्य होती. इंग्लंडची स्थिती अशी आहे की फ्रंट लाइन वर्कर असल्याने माझ्या पतीची तपासणी तर झाली पण एक सर्व सामान्य नागरीक असल्याने माझी तपासणी झाली नाही. आवश्यकतेनुसार चाचणी करू न शकणे इंग्लंडच नव्हे तर जगातील सर्वच देशांमध्ये आज सर्वात मोठी समस्या आहे. यामुळे आमच्याकडे १४ दिवसांच्या विलगीकरणात जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मला विषाणूच्या लक्षणांची तेवढी भीती नव्हती जेवढी त्या अज्ञात परिस्थितीबद्दल होती ज्याकडे आम्ही जात होतो. आज समाजात सर्वात मोठी समस्या ते लोक आहेत जे असिम्टेमॅटिक आहेत म्हणजे बाधित तर आहेत पण त्यांच्यात संसर्गाचे कोणतेही लक्षण नाही. म्हणजे ते अजाणतेपणे संसर्ग पसरवत आहेत. मी एक कॉर्पोरेट व्यावसायिक असल्याने मला माझ्या नेटवर्कच्या माध्यमातून वॉलेंटिअर आधारीत मोहिमेची माहिती मिळाली आणि मी त्यात सहभागी झाले. यात मायक्रोबॉयोजॉजिस्ट, शास्त्रज्ञ आणि इतर कॉर्पोरेट व्यावसायिक सहभागी होते. एक अद्भूत टीम तयार होत होती ज्यात वैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय पार्श्वभूमी असलेले लोक एकत्र येत या विषाणूविरोधात सज्ज होत होते. इंग्लंडमध्ये आज अनेक प्रयोगशाळा आहेत जेथे उपकरणे आणि तंत्रज्ञ दोघे आहेत मात्र तेथे कोविड १९ ची चाचणी हाेत नव्हती. म्हणून आम्ही अशा प्रयोगशाळा स्थापन करणे सुरू केले म्हणजे त्यांना आर्थिक मदत देऊन कोविड १९ च्या चाचणीसाठी तयार करता येईल आणि कमीत कमी आघाडीवर काम करणाऱ्यांची चाचणी होऊ शकेल. यात आम्हाला खूप यश मिळाले. अनेक प्रयोगशाळा आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत आणि या कार्यक्रमात अनेक जण स्वेच्छेने २४ तास, सातही दिवस सतत काम करत आहेत. अनेक लहान युद्ध मिळून एक मोठे युद्ध निर्माण होते आणि खूप लहान लहान योगदान एकत्र केले तर युद्ध जिंकता येते, हे आपण विसरायला नको. या काेरोना युद्धात एक लहानसा भाग बनली याचे मला समाधान आहे.

बातम्या आणखी आहेत...