आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँटिलिया प्रकरणात अटकेत असेलला मुंबई पोलिसचा निलंबित API सचिन वाझेची NIA कोठडी आज संपली. NIA कोर्टाने सचिन वाझेला 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा अजून तपास करायचा आहे असे म्हणत NIA वाझेची कोठडी पुन्हा वाढवण्याची मागणी केली होती. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान वाझेच्या वकिलांनी त्याला तुरुंगाच्या सेफ सेलमध्ये ठेवण्याची मागणी केली.
एनआयएने जप्त केलेले पुरावे व कागदपत्रांची तपासणी करणार असल्याचे सांगितले होते. सुनावणीदरम्यान कोर्टाने सीबीआयची याचिकाही मान्य केली. कोर्टासमोर हजर होण्यापूर्वीच सीबीआयच्या पथकाने तिसर्यांदा सचिन वाझेवर चौकशी केली. NIA च्या टीमने या प्रकरणात माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांचाही दोन वेळा जबाब नोंदवलेला आहे. बुधवारी शर्मा यांची 8 तास आणि गुरुवारी 9 तास चौकशी करण्यात आली. सूत्रांनुसार, NIA ला संशय आहे की, वाझेच्या पूर्ण गेममध्ये शर्मांचाही हात असू शकतो.
NIA, UAPA मध्ये 30 दिवसांची कोठडी हवी आहे
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA) सध्या अँटिलिया स्फोटक जप्ती प्रकरण आणि स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करत आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्र ATS ने हिरेनच्या हत्येचा तपास सुरू केला आणि माजी कॉन्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी राजेश गोरे यांना अटक केली. सचिन वाझे 9 एप्रिलपर्यंत NIA ताब्यात आहे, तर शिंदे आणि गोरे यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. कोर्टाच्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरलने त्याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत 30 दिवसांच्या कोठडीत ठेवण्याची मागणी केली होती, ज्याची आज पुन्हा न्यायालयात पुनरावृत्ती होऊ शकते.
सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले होते की, पुढच्या हजेरीदरम्यान सचिन वाझेविषयी एक डिटेल हेल्थ रिपोर्ट सादर करावा. कोर्टाच्या आदेशानुसार गुरुवारी वाझेची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. आज तो अहवाल न्यायालयातही सादर केला जाईल.
वाझेच्या कस्टडीसाठी CBI चा अर्ज
तर मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्या माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील 100 कोटी वसूलीच्या आरोपा प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नेही वाझेच्या कस्टडीसाठी आज न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अर्जामध्ये CBI ने, NIA च्या कस्टडीमध्ये असलेल्या वाझेच्या डायरीचा तपास मागितला आहे, ज्या डायरीमध्ये वाझेने पैशांचा हिशोब मांडलेला होता. ही डायरी क्राइम इंटेलिजेंस यूनिटच्या एका लॉकरमधून मिळाली होती. या व्यतिरिक्त NIA ला वाझेच्या नीकटवर्तीय महिलेकडूनही एक डायरी सापडली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.