आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईच्या तळोजा तुरूंगात पोहोचलेल्या सचिन वाझेबद्दल दररोज नवे खुलासे होत आहेत. राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीने (NIA) केलेल्या 27 दिवसांच्या कठोर चौकशीत असे उघडकीस आले आहे की जिलेटिन प्रकरणानंतर सचिन वाझे काहीतरी मोठे करणार होता. त्याची माहिती NIA टीम लवकरच जाहीर करु शकते. 25 फेब्रुवारीला अँटिलिया बाहेरून जिलेटिनने भरलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतली आणि 5 मार्च रोजी गाडीचा मालक मनसुख हिरेन ठार झाला. NIA या दोन्ही प्रकरणांचा तपास करत होता.
NIA ने दोन्ही प्रकरणांचा तपास पूर्ण केला
यापूर्वी NIA च कोर्टात सांगितले होते की वाझेची आम्हाला आणखी चौकशी गरज नाही. म्हणजे NIA ने जिलेटिन प्रकरणाची चौकशी जवळजवळ पूर्ण केली आहे. NIA लवकरच या दोन्ही प्रकरणांचा खुलासा करू शकते.
मोठ्या एन्काउंटरचे वाझेचे नियोजन होते
NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ कांड झाल्यानंतर सचिन वाझे एका एन्काउंटरची योजना आखत होता. यात तो काही लोकांचे एन्काउंटर करुन हे सर्व प्रकरण त्यांच्यावर टाकणार होता. औरंगाबाद येथून चोरी झालेल्या 'मारुती इको' कारमध्ये एन्काऊंटर होणार होता. या एन्काउंटरमध्ये मनसुख हिरेनलाही शिकार बनवले जाऊ शकले असते असा NIAला संशय आहे. या एन्काउंटरमध्ये दिल्लीतील गुन्हेगारावर निशाणा साधण्याचेही नियोजन होते, असे तपासात पुढे आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मारल्यानंतर त्याला संपूर्ण प्रकरण या लोकांच्या डोक्यावर घालायचे होते. यापूर्वीच NIA ची या प्रकरणात एंट्री झाली आणि वाझेची प्लानिंग फेल गेली.
सचिन वाझेला 14 दिवसांसाठी तुरूंगात पाठवण्यात आले
मुंबईच्या NIA कोर्टाने सचिन वाझेला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तळोजा तुरूंगात पाठवले आहे. शुक्रवारी त्याचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. अहवालानुसार त्याला कोणत्याही प्रकारचे कॉर्डिओ ट्रीटमेंटची आवश्यकता नाही. त्यानंतर कोर्टाने त्याला 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
NIA ला या गोष्टी वाझेकडून मिळाल्या
सुनावणीदरम्यान NIA ने सांगितले की त्यांना वाझेकडून अनेक लाखांची रोकड, बेनामी काडतुसे आणि दीड कोटी रुपये बँक खात्यात जमा असल्याची माहिती मिळाली. NIA चा दावा होता की हिरेनदेखील अँटिलिया प्रकरणात सहभागी होता. ज्यामुळे त्याने प्राण गमावले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.