आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sacrifice Your Own Children Instead Of Slaughtering Goats MLA Nandkishore Gurjar

भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य:बकरे कापण्यापेक्षा स्वतःच्या मुलांचा बळी द्या- नंदकिशोर गुर्जर

गाझियाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील लोनीचे भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता ते परत एकदा चर्चेत आले आहे. यावेळी त्यांनी बकरी ईदवर दिल्या जाणाऱ्या कुर्बानीवर वक्तव्य केले आहे. गुर्जर म्हणाले की, 'देशात कोरोना महामारी पसरली आहे, यामुळे बकऱ्यांची बळी देऊ नका. बळी द्यायची असेल, तर आपल्या मुलांचा बळी द्या.'

'बळी द्यायचा असेल, तर आपल्या मुलांचा द्या'

गुर्जर पुढे म्हणाले की, 'बकरी ईदच्या दिवशी बळी देऊ देणार नाहीत. जर कोणी बळी दिली, तर त्याच्याविरोधात कारवाई केली जावी. जुन्या काळात सनातन धर्मात बळी देण्याची प्रथा होती, पण आता लोक बळीऐवजी नारळ फोडतात. आता बकरीचा वध नाही केला जणार. पवित्र वस्तुला समर्पित करणे, असा बळीचा अर्थ असतो. लोक आपल्या मुलांचा बळी देत नाहीत, मुक्या जनावरांना मारुन खातात.'

'बळी देऊ देणार नाहीत'

गुर्जर पुढे म्हणाले की, 'जे बकऱ्याला मारुन खातील, पुढच्या जन्मात ते बकरा होतील आणि लोक त्यांना मारुन खातील. निसर्गाचा नियम आहे, जसे कराल, तसे भराल. कोणीही बळी देऊ नये, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.'