आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sadhvi Pragya Kabaddi| Kabaddi Video| Sadhvi Pragya Thakur Seen Playing Kabaddi After Garba; Congress Leader Asks Why She Needs Wheel Chairs News And Updates

कबड्डीच्या मैदानात साध्वी प्रज्ञा ठाकूर:गरबानंतर कबड्डी खेळताना दिसून आल्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर; काँग्रेसने व्हिडिओ शेअर करून लिहिले- कोण म्हणेल यांना व्हीलचेअर लागते

नवी दिल्ली3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमी व्हीलचेअरवर दिसणारी भोपाळ येथील खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपुर्वीच त्यांनी गरबाचा देखील आनंद लुटला होता. त्यानंतर आता त्यांचा कबड्‌डी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या देशभरात दुर्गा पुजेचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यात ठाकूर यांनी बंगाली समाजातील दुर्गा पूजा कार्यक्रमात सहभाग घेतला होता. दुर्गा पुजा संपन्न झाल्यानंतर त्यांनी चक्क ग्राउंडवर जाऊन खेळाडूंसोबत कबड्डी खेळली.

प्रज्ञा यांच्या कबड्डी खेळण्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार निशाणा लावला आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता नरेंद्र सलूजा यांनी प्रज्ञा यांच्या कबड्डीचा व्हिडीओ ट्विटर शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहले आहे की, 'कोण म्हणतो की, प्रज्ञा ठाकूर व्हीलचेअरवर चालते? प्रज्ञा ठाकूर पुर्णपणे निरोगी आहे. ते गरबा पण खेळतात, बास्केटबॉल सुद्धा खेळतात, ढोल ताश्यांच्या गजरात डान्स देखील करतात, हे परमेश्वर त्यांना निरोगी आरोग्य दे' असे म्हणत नरेंद्र सलूजा यांनी प्रज्ञा यांच्यावर टीका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...