आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Safdarjung Hospital Claims That Victim Was Not Raped, Forgot To Know The True Cause Of Death

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नवीन खुलासा:सफदरजंग हॉस्पीटलचा दावा- पीडितेवर बलात्कार झालाच नाही, मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी विसरा प्रिजर्व केला

हाथरस8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सफदरजंग हॉस्पीटलमधील तीन डॉक्टरांच्या पॅनलने पोस्टमार्टम केले

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि मृत्यूनंतर आता तिची पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली आहे. कुटुंबियांनी दावा केला होता की, तरुणीची जीभा कापून आणि मनक्याचे हाड मोडले होते. पण, आता दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पीटलमधील तीन डॉक्टरांच्या पॅनलने ऑटोप्सी रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, तरुणीवर बलात्कार झाला नाही. प्रायवेट पार्टमध्ये पीरियडच्या दिवसांचे लक्षण मिळाले आहेत, बलात्काराचे नाही. गळ्यावर जखमांचे निशान आहेत, मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी विसरा प्रिजर्व केला आहे.

दोन हॉस्पीटलच्या मेडिकल रिपोर्टमध्ये बलात्काराची पुष्टी नाही

तरुणीची मेडिकल तपासणी अलीगडच्या जेएन मेडिकल कॉलेजमध्ये झाली होती. त्यात तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगण्यात आले. आता हीच रिपोर्ट दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पीटलच्या डॉक्टरांनीही दिली आहे. हॉस्पीटलच्या तीन डॉक्टरांच्या पॅनेलने दावा केला आहे की, तरुणीवर बलात्कार झाला नाही. तरुणीच्या प्रायवेट पार्टमध्ये पीरियडचे लक्षण आढळले आहेत, बलात्काराचे नाही. डॉक्टरांनी सांगितले की, तरुणीचा गळा दाबण्यात आला आहे, पण मृत्यूचे नमके कारण जाणून घेण्यासाठी विसरा प्रिजर्व केला आहे.

बातम्या आणखी आहेत...