आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझारखंडमधील जैन समुदायाचे तीर्थस्थळ सम्मेद शिखरला पर्यटनमुक्त करण्यासाठी उपोषणाला बसलेले मुनी सुज्ञेयसागर महाराज यांनी मंगळवारी प्राण त्यागले. ७२ वर्षीय मुनी झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात २५ डिसेंबरपासून जयपूरमध्ये आमरण उपोषण (संलेखना व्रत) करत होते. सांगानेर संघीजी मंदिरातून त्यांची डोली यात्रा काढण्यात आली. सांगानेरमध्येच समाधी देण्यात आली. आता आणखी एक मुनी समर्थसागर महाराज आमरण उपोषणाला बसले आहेत. मुनी आचार्य शशांक म्हणाले, जैन समाज अहिंसक पद्धतीने आंदोलन करत आहे. सरकारने निर्णय मागे न घेतल्यास जैन समाज हिंसक आंदोलन करेल.
झारखंडच्या सोरेन सरकारने गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ डोंगराला पर्यटनस्थळ घोषित केले. पारसनाथ डोंगर जैन समाजाचे सर्वोच्च तीर्थ आहे. सरकारने ते पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी २५० पानांचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. यामुळे नागरी सुविधा वाढतील, असा सरकारचा दावा आहे.
इको टुरिझम नव्हे, इको तीर्थ बनवावे; पावित्र्य कायम राहील : प्रमाणसागर
सम्मेद शिखरावर जैन धर्माच्या २४ पैकी २० तीर्थंकरांनी निर्वाण प्राप्त केले. २३वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथांनीही इथेच निर्वाण प्राप्त केले. मुनिश्री प्रमाणसागरजी म्हणतात, सम्मेद शिखरच्या ५ किमी परिसराला इको टुरिझम नव्हे, तर इको तीर्थ बनवले पाहिजे, जेणेकरून पावित्र्य कायम राहील.
जैन समाजाच्या सर्व वर्गांतील जवळपास १५ हजार लोकांनी सुरतमध्ये मंगळवारी मूकमोर्चा काढला. गुजरात सरकारने जैन धर्माशी संबंधित मुद्दे निकाली काढण्यासाठी एक टीम स्थापन करण्याची घोषणा केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.