आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:सोनाली नवांगुळ यांना ‘साहित्य अकादमी’ अनुवाद पुरस्कार जाहीर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य अकादमीचे अनुवाद पुरस्कार जाहीर झाले असून मराठी भाषेसाठी हा पुरस्कार कोल्हापूरच्या सोनाली प्रकाश नवांगुळ यांच्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीला मिळाला आहे. सलमा यांच्या मूळ तामिळ भाषेतील कादंबरीचा हा अनुवाद आहे. यापूर्वी त्यांच्या ‘जॉयस्टिक’ या ग्रंथाला दमसा सभेचा पुरस्कार मिळालेला आहे. मूळ बत्तीस शिराळा येथील रहिवासी सोनाली वयाच्या नवव्या वर्षी पाठीवर बैलगाडी पडल्याने जखमी झाल्या.

यात शरीराच्या खालच्या भागाला कायम अपंगत्व आले. यानंतर सोनालींनी घरातच राहून पदवीपर्यंतच्या परीक्षा दिल्या.२००० मध्ये त्या कोल्हापुरात आल्या. त्यांनी हेल्पर्स अॉफ दि हँडिकॅप्ड या संस्थेत २००७ पर्यंत सोशल वर्कर म्हणून काम केले. याच काळात समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी सोनाली या संस्थेतून बाहेर पडल्या आणि त्यांनी अनेक पुस्तकांचे भाषांतर केले. स्वतंत्र दर्जेदार लिखाणही केले.

बातम्या आणखी आहेत...