आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक शोषणाचा आरोप:महिला संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, साईने विदेशातून सायकलिस्ट संघ माघारी बोलावला

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महिला सायकलिस्ट संघाचे प्रशिक्षक आर. के. शर्मा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आल्यानंतर स्लोव्हानियाला गेलेला भारतीय संघ माघारी बोलावण्यात आला आहे. देशातील टॉप महिला सायकलिस्टने भारतीय खेळ प्राधिकरणाकडे (साई) प्रशिक्षकाची तक्रार केली होती. शर्मा यांनी स्लोव्हानियात सुरू असलेल्या कॅम्पमध्ये आपल्या मुलीपेक्षाही कमी वयाच्या सायकलिस्टला पत्नी बनवण्याचा प्रस्ताव दिला आणि तिला आपल्या खोलीत येण्यासाठी दबाव आणला. प्रकरण उघडकीस आल्यानंतर साईनेही शर्मांविरुद्ध कारवाईची तयारी केली आहे.

यापूर्वीही अधिकारी, प्रशिक्षकांवर झालेे शोषणाचे आरोप
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सोनिपतमध्ये सुशीलकुमार कुस्ती अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थीने विवाहित प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. खेळाडूने विरोध केला तेव्हा प्रशिक्षकाने प्रशिक्षणार्थी आणि त्याच्या १७ वर्षीय भावाची हत्या केली. २०१४ मध्ये ईशान्येकडील दोन खेळाडूंनी ५५ वर्षीय प्रशिक्षकावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. २०१३ मध्ये साई गांधीनगरच्या दोन खेळाडूंनीही प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. २०१४ मध्ये हिसारचा कुस्ती प्रशिक्षक सतवीरवर अल्पवयीन प्रशिक्षणार्थीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. यात प्रशिक्षकाला अटक झाली होती. २०१४ च्या एशियन खेळांदरम्यान खेळाडूंनी प्रशिक्षक मनोज राणावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. २००९ मध्ये आंध्रातील दोन महिला क्रिकेटरने असोसिएशनच्या उच्च अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप
केला होता.

बातम्या आणखी आहेत...