आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुप्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी देशातील 6 मुख्यमंत्री बिहारमधील आपल्या प्रचार मोहिमेचा खर्च उचलणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले - 'मी त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी माझा खांदा दिला. त्यांच्याकडून एक पैसाही घेतला नाही. आता तेच लोक बिहारमधील माझ्या मोहिमेसाठी मदत करतील.'
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जन सुराज यात्रा सुरू आहे. त्यांनी शुक्रवारी हाजीपूरमध्ये या यात्रेसाठी पैसा कुठून येतो याचा खुलासा केला. देशातील 6 मुख्यमंत्री माझे प्रायोजक आहेत. तेच माझा खर्च उचलत आहेत, असे ते म्हणाले.
कोणत्याही पक्षाची 'बी' टीम बनणार नाही
PK मोठ्या उत्साहाने जन सुराज यात्रा काढत आहेत. आपण कोणत्याही पक्षाची 'बी' टीम म्हणून काम करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 'देशातील कोणत्याही पक्षाकडे आपल्याला 'बी' टीम करता येईल एवढा पैसा व हिंमत नाही,' असे ते म्हणाले.
'देशातील अनेक मुख्यमंत्र्यांना मी मदत केली. त्यासाठी त्यांच्याकडून एक छदामही घेतला नाही. त्यामुळे मी आता येथे काम करण्यास सुरूवात केल्यानंतर ते माझ्या मदतीसाठी उभे आहेत. लोक पैसा कुठून येणार असा प्रश्न करत आहेत. त्यावर आम्ही त्यांना बिहारमध्ये नवा प्रयोग सुरू असल्यामुळे तुम्हीच मदत करा, असे आवाहन करत आहोत,' असेही प्रशांत किशोर यावेळी म्हणाले.
'काहीजण माझ्यावर तुम्ही खूप चांगले नारे लिहिता असे आरोप करतात. माझे त्यांना म्हणणे आहे. जर स्लोगन लिहिण्यामुळे निवडणूक जिंकता आली असती, तर देशात ते लिहिणारे अनेकजण आहेत. लोक आतापर्यंत मी काय करतो याचा विचार करत आहेत. पण, अद्याप त्यांना माझ्यावर उपाय सापडला नाही. कुणी काहीही म्हटले तरी त्याचा आमच्या कामावर कोणताही परिणाम पडत नाही. त्यामुळेच आमचा आतापर्यंत निवडणुकीत पराभव झाला नाही,' असे पीके म्हणाले.
पीके 6 नितीश कुमारांसह 6 मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय
प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत 11 निवडणुकांसाठी काम केले आहे. बिहारमध्ये त्यांनी नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले. त्यानंतर त्यांनी तेलंगणात मुख्यमंत्री केसीआर यांच्यासाठी काम केले. याशिवाय आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी, तामिळनाडूत मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, दिल्लीत अरविंद केजरीवाल व पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी त्यांनी काम केले.
त्यामुळे आता यापैकी किती मुख्यमंत्री त्यांच्या मदतीसाठी धावून येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी अद्याप वरील पैकी किती मुख्यमंत्री त्यांच्या मदतीसाठी येणार आहेत याचा खुलासा केला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.