आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Saints Said, POK Should Be In India, Bhagwat Said, Wishes Will Be Fulfilled Word Given At Sanatan Sanskriti Satsang Ceremony

सनातन संस्कृती सत्संग सोहळ्यात दिला शब्द:संत म्हणाले, पीओके भारतात हवे; भागवत म्हणाले, इच्छा पूर्ण होईल

बक्सर (बिहार)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सनातन संस्कृती सत्संग सोहळ्यात संत - महंतांनी पाकव्याप्त काश्मीरबद्दल व्यक्त केलेली इच्छा अवश्य पूर्ण होईल, असा शब्द मंगळवारी सरसंघचालक मोहन भागवत यांनी संतांना दिला.

सत्संग सोहळ्यात तुलशी पीठाधीश्वर रामभद्राचार्य म्हणाले, आपण ३७० कलम हटवले. हसत हसत अयोध्या मिळवली. काशी, मथुरा, ज्ञानवापी अद्याप बाकी आहे. एवढेच नव्हे तर पीओके आमचाच आहे. ताेही मिळावा. याला उत्तर देताना भागवत म्हणाले, कोणतेही कर्म करण्यासाठी पुरुषार्थ गाजवावा लागतो. संतांची इच्छा पूर्ण होईल.

गोहत्याबंदीची मागणी संत रामभद्राचार्य यांनी या वेळी अनेक मुद्दे उपस्थित केले. गोहत्या बंद झाली पाहिजे. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. चीनने कब्जात केलेला भारताचा भूभाग परत मिळवला पाहिजे. यावर पीओके आणि अक्साई चीनबद्दल संतांनी ज्या इच्छा व्यक्त केल्या त्या अवश्य पूर्ण होतील, असे भागवत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...