आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांसाठी दोन महत्त्वाच्या बातम्या:फ्रेशर्ससाठी बंगळुरू टॉप, वर्षाला मिळत आहेत 5 लाख

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुण फ्रेशर्सना सर्वात चांगले वेतन बंगळुरूत मिळत आहे. येथे पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरासरी वर्षाला ५.०५ लाख रु. मिळतात. विशेष म्हणजे बंगळुरूत आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आकर्षक वेतन असून इतर सर्व प्रकारच्या नोकऱ्यांतही सरासरी वेतन इतर शहरांपेक्षा २०% जास्त आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे बंगळुरूमध्ये नोकरी मिळवणाऱ्या प्रत्येक १०० लोकांमध्ये १३ जण फ्रेशर असतात. मुंबईत १२%, दिल्ली-एनसीआर ९% आणि पुण्यात ८% फ्रेशर्स नोकरी करत आहेत.

फ्रेशर्सचे सरासरी वेतन
22%इतर सर्व
बंगळुरू५.०५ लाख
(संख्या कोटींमध्ये)

सर्वात जास्त नोकऱ्या आयटी-सॉफ्टवेअरमध्ये

4%आरोग्यसेवा 5%शिक्षण 10%बीपीओ-आयटीईएस 19%आयटी-सॉफ्टवेअर चेन्नई₹४.४३ लाख कोलकाता३.९८ लाख मुंबई४.२५ लाख दिल्ली-एनसीआर₹ ४.४८ लाख

-----

जॉब :1 वर्षात ‘ईपीएफओ’सोबत जोडले गेले 1.39 कोटी लोक

बंगळुरू :

२०२२-२३ च्या मार्च महिन्यामध्ये स्थायी नोकऱ्या १०.१% वाढल्या. ही या वर्षाच्या कोणत्याही एका महिन्यातील सर्वात वेगवान वृद्धी आहे. मार्चमध्ये १३.४ लाख लोक ईपीएफओशी जोडले गेले. फेब्रुवारीत १२.२ लाख जोडले. ईपीएफओच्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ मध्ये १.३९ कोटी नवे सदस्य ईपीएफओशी जोडले गेले. ही संख्या गेल्या वर्षापेक्षा १३% जास्त आहे.

ईपीएफ ईएसआयसी
२०१८-१९ ०.६१ १.४९
२०१९-२० ०.७९ १.५२
२०२०-२१ ०.७७ १.१५
२०२१-२२ १.२२ १.४९
२०२२-२३ १.३९ १.५५

ईपीएफओशी जोडणारे दोन वर्षांपूर्वी केवळ ७७ लाख होते, आता दुप्पट संघटित क्षेत्रात कार्यरत दरमहा २१,००० रु. पेक्षा कमी वेतनाचे लोक ईएसआयसीच्या कक्षेत येतात. त्यांना ईएसआयसी रुग्णालयांत मोफत उपचाराचा अधिकार आहे.