आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी:सलमान खान आणि वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र; सिद्धू मुसेवाला करु असाही आशय

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाॅलिवूड सुपरस्टार सलमान खान याला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र सलमानचे वडील सलीम खान यांच्या अंगरक्षकाला प्राप्त झाले आहे. या पत्रात सलमानचा सिद्धु मुसेवाला करु अशी धमकी देण्यात आली आहे. या पत्रामुळे एकच खळबळ माजली असून या प्रकरणी सलमानच्या तक्रारीनुसार आज वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

सलमानच्या सुरक्षेत वाढ

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर मुंबई पोलिसांनी यापूर्वी सलमान खानची सुरक्षा वाढवली होती. वास्तविक, मुसेवालाच्या हत्येमध्ये ज्या गँगस्टरचे नाव आले, त्याने 2008 मध्ये सलमानला खुनाची धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्याचा

मिळाले निनावी पत्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम खान यांच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याला धमकीचे पत्र सापडले. सलीम खान वॉकला गेल्यानंतर दररोज जिथे रोज विश्रांती करतात, तिथे एका बेंचवर हे पत्र सापडले आहे. या पत्रात सलमान आणि सलीम खान दोघांना गंभीर धमक्या देण्यात आल्या आहेत. "मुसावला करु", असा आशयही पत्रात आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी

आरोपींचा शोध घेण्यासाठी बँड स्टँड परिसरातील सीसीटीव्ही कॅमरे चेक केले जात आहेत. घटनेमागे नेमके कोण आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यात पंजाबी गायक 'सिद्धू मूसेवाला' याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे गँगस्टर लॉरेंस बिश्नोई असल्याची माहिती समोर आली होती. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कारण लॉरेंस बिश्नोईने याआधी सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. लॉरेंसने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

जोधपूर कोर्टात गँगस्टर लॉरेन्स. 2008 मध्ये त्याने कोर्टात सलमानला जीवे मारणार असल्याचे जाहीरपणे वक्तव्य केले होते. (संग्रहित फोटो)
जोधपूर कोर्टात गँगस्टर लॉरेन्स. 2008 मध्ये त्याने कोर्टात सलमानला जीवे मारणार असल्याचे जाहीरपणे वक्तव्य केले होते. (संग्रहित फोटो)

काळवीट प्रकरणी सलमानला धमकी देण्यात आली होती

लॉरेन्स बिश्नोई याने काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. बिश्नोई समाज काळवीटाला पवित्र मानतो, त्यामुळे त्याची शिकार केल्याचा आरोप असलेल्या सलमान खानला मारण्याची धमकी लॉरेन्सने दिली होती.

जोधपूरमध्ये सलमानला मारण्याचा होता कट

2008 मध्ये कोर्टाबाहेर लॉरेन्स बिश्नोईने जोधपूरमध्ये सलमान खानला मारणार असल्याचे सांगितले होते. तो असेही म्हणाला होता की, 'मी अजून काही केले नाही, पण जेव्हा मी सलमान खानला मारेन तेव्हा मग कळेल. सध्या मला अनावश्यक गोष्टींमध्ये ओढले जात आहे.

सलमान खानचा वर्कफ्रंट

सलमान खान नुकताच अबुधाबीच्या यास बेटावर आयफा अवॉर्ड्सचा होस्ट म्हणून गेला होता. याशिवाय तो आता 'कभी ईद कभी दिवाली'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. टायगर मालिकेतील तिसरा चित्रपट टायगर 3 मध्येही तो काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफही दिसणार आहे. यासोबतच तो आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा आणि शाहरुख खानच्या पठाणमध्येही छोट्या भूमिकेत दिसणार आहे.

लॉरेसचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल

लॉरेसचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2021मधील आहे. जेव्हा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लॉरेंस आणि त्याच्या गँगला देशातील वेगवेगळ्या राज्यातून मकोका केसअंतर्गत ताब्यात घेतले होते. या व्हिडीओमध्ये लॉरेंससह त्याचा साथीदार संपत देखील दिसतो. संपत हा लॉरेंसचा राजस्थानचा साथीदार आहे. संपतने सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर रेकी केली होती. पण पोलिसांनी त्याला तेव्हा ताब्यात घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...