आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khurshid Book Contro | Hindutva | Marathi News| Salman Khurshid House In Nainital Torched After Book Controversy Latest News And Updates

पुस्तकाविरुद्ध हिंसा:काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक, आगही लावली; भाजपचा झेंडा हातात घेऊन घोषणाबाजी

नैनीताल23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या नैनीताल येथील घरावर सोमवारी जमावाने दगडफेक केली. मीडिया रिपोर्टनुसार, हातात भाजपचे झेंडे घेऊन घोषणाबाजी घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर खुर्शीद यांच्या घरात आगही लागली. तत्पूर्वी या जमावाने खुर्शीद यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

सलमान खुर्शीद यांनी नुकतेच लिहिलेल्या पुस्तकावरून हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या विरोधात उतरल्या आहेत. त्यांनी आपल्या पुस्तकात कट्टर हिंदुत्वाची तुलना ISIS आणि बोको हरमसारख्या दहशतवादी संघटनांसोबत केली. असे लिखान करून सलमान खुर्शीद जगभरात हिंदू समुदायाची प्रतिमा मलीन करत आहेत असा या संघटनांचा आरोप आहे.

यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने सलमान खुर्शीद यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. सोबतच अशा लोकांना पाकिस्तानात हकलून लावण्याचा सल्ला देताना जीभ कापण्याची धमकी सुद्धा दिली होती.

खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे, की "हिंदुत्व हे साधू-संतांच्या सनातन आणि प्राचीन हिंदू धर्माला बाजूला सारत आहे. हे ISIS आणि बोको हरमसारख्या जिहादी इस्लामिक संघटनांसारखे आहे." असे खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकातील 'सॅफ्रॉन स्काय' या चॅप्टरमध्ये लिहिले.

दरम्यान, नैनीतालमध्ये घडलेल्या सोमवारच्या घटनेनंतर सलमान खुर्शीद यांनी आपल्या सोशल मीडियावर घटनास्थळाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. तसेच आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. उलट, घटनेचे फोटो जारी करताना मी अजुनही चूक वाटतो का? हेच हिंदुत्व आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...