आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khurshid Interview| Marathi News| Salman Khurshid On Controversial Book In Divya Marathi Interview

इंटरव्ह्यू:मी हे दहशतवादी आहेत असे म्हणालो नाही, 'त्या' संघटना सुद्धा धर्माचा दुरुपयोग करतात! सलमान खुर्शीद यांची मुलाखत

नवी दिल्ली : मुकेश कौशिक/पवनकुमार13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्येवरून काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर गोंधळ निर्माण झाला असला तरी त्यांनी एक शब्दही चुकीचा नसल्याचे म्हटले आहे. हिंदुत्वाच्या राजकारणाची तुलना आयएसआयएस व बोको हरामसारख्या संघटनांशी केल्याच्या आरोपात म्हटले की, दोघे धर्माचा वापर करतात यावर केली आहे. या चर्चेतील काही मुद्दे...

हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस व बोको हरामशी करणे जास्त नाही वाटत...
अतिशयोक्ती झाली असेल तर कुठे ते सांगा. मी हे दहशतवादी आहेत असे म्हणालो नाही. मी म्हणालो, त्यांच्यासारखे आहेत. त्या संघटनाही धर्माचा दुरुपयोग करतात.

काँग्रेसमध्ये जानवेधारी नेतृत्वाबाबत बोलले गेले आहे?
असे म्हणणाऱ्यांना सांगतो, आमची लीडरशिप असे म्हणत नाही. आमचे नेतृत्व जानव्याच्या मदतीने नव्हे तर घटनेच्या आधारावर राजकारण करते.

काँग्रेसचे लोक हिंदू असल्याचा प्रचार करतात?
राहुल तर करत नाहीत.

प्रियंका बनारसच्या सभेत मंदिरात गेल्या, रॅलीची सुरुवात ‘जय माता दी’ या घोषणेने केली होती...
त्या श्रद्धेचे खूप लोक होते. कुणी जय दुर्गा म्हणो, मला आक्षेप नाही.

हा धार्मिक भावनांचा उपयोग नाही?
धर्मनिरपेक्षचा अर्थ धार्मिक नाही असे होत नाही.

तुम्ही राम मंदिराच्या भव्य निर्मितीवर प्रश्न उपस्थित केला आहे?
मी म्हणतो, मंदिराचे भव्य बांधकाम व्हावे, मात्र सुप्रीम कोर्टाने मशीद बांधकामाबाबत बोलले आहे. त्याचेही स्वागत व्हावे.

हिंदूंचा विश्वास जास्त जिंकण्याचा प्रयत्न करावा लागत आहे?
हिंदू जास्त आहेत यामुळे जास्त प्रयत्न होत आहेत. मुस्लिम कमी आहेत म्हणून कमी प्रयत्न होत आहेत.

राहुल धर्मनिरपेक्ष राजकारणासाठी मशीद बांधकामाच्या प्रारंभाला जातील?
राहुलना मंदिराच्या शिलान्यासाला बोलावले नाही. ते मशिदीसाठी गेल्यास म्हणतील, मंदिराच्या शिलान्यासास गेले नाहीत, मशिदीसाठी जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...