आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशाल चिन्हासंबंधी समता पार्टीची याचिका फेटाळली:दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिले होते आव्हान

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या मशाल या निवडणूक चिन्हाविरुद्ध समता पार्टीने दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. यापूर्वी एक सदस्यीय न्यायपीठानेही ही याचिका फेटाळल्यानंतर समता पार्टीने या न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

मुख्य न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा आणि न्या. सुब्रमण्यम प्रसाद यांनी याचिकाकर्त्यांचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. पेटती मशाल याच चिन्हावर निवडणुका लढवल्याचे समता पार्टीचे म्हणणे होते. यापूर्वी न्यायपीठाने त्यांची अशीच याचिका फेटाळताना याचिकाकर्ता केवळ एक अधिकार सांगत निवडणूक आयोगाचा निर्णय रद्दबातल करण्याची मागणी करू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवले होते.

आयोगाने दिले होते चिन्ह शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट बाहेर पडल्यानंतर अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्य कुणाचे, यावरून दोन गटात वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीसाठी मशाल हे चिन्ह बहाल केले होते.

बातम्या आणखी आहेत...