आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र:महाराष्ट्रात नव्या आघाडीची घोषणा; आगामी निवडणुका एकत्र लढवणार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र आल्याची काम करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षांनी म्हटले आहे. प्रादेशिक संपूण टाकण्याचं कट कारस्थान सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमवीर शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचे मी स्वागत करतो. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी, व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं मात्र न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा विषय नाही, हा लोकशाहीच्या भवितव्याचा विषय आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते.

आगामी सर्व निवडणुका संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र लढवणार आहे. लोकशाही आणि प्रादेशिक आस्मिता जपण्यासाठी ही युती करण्यात आल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. भाजपची साथ सोडल्यानंतर संभाजी ब्रिगेड यांची युती केली आहे. लोकशाहीला चिरडण्याची भूमिका घेणाऱ्यांना रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,असे ठाकरेंनी सांगितले आहे.

वाजपेयी यांच्या काळात जवळपास 28 जणांना सोबत घेत युती करण्यात आली होती. आता तर केवळ आम्हीच सोबत आलो आहोत. संभाजी ब्रिगेडने सत्तेसाठी आमची साथ दिली नाहीये, नाहीतर आमची सत्ता असतानाच ते आमच्यासोबत आले असते. मात्र, येणाऱ्या काळात लढवय्या सहकाऱ्यांसोबत आम्ही पुन्हा सत्ता स्थापन करू असा दावाही उद्धव् ठाकरेंनी केला आहे.

ठाकरेंचा भाजपला टोला

राष्ट्रीय स्वयसेवक संघाची विचारधारा काय आहे, भाजपची संध्याची विचारधारा ही संघाची आहे का? भाजप संघाची विचारसरणी पुढे नेत आहे का असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला आहे.तर असंघाची संघ तुटला बरे झाले, शिंदे गेले असे म्हणत त्यांनी शिंदेंवरही निशाणा साधला आहे.

संघटनात्मक बांधणी करणार

दसरा मेळावा झाला की महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार असून माझ्या कुटुंबातील सर्वांशी चर्चा करणार आहे. असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले आहे. आता आदित्य ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंही महाराष्ट्राच्या दौरा करत संघटनात्मक बांधणी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...