आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशमधील संभळ जिल्ह्यात बुधवारी सकाळी भरधाव वेगात रोडवेज बस आणि टँकरची जोरदार धडक झाली. यात बसमधील आठ जणांचा मृत्यू. 25 प्रवासी जखमी आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मृत्यूची संख्या वाढू शकते. मुरादाबाद-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धानारी पोलिस स्टेशन परिसरात हा अपघात झाला.
दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बस चंदौसी येथून प्रवाशांसह अलीगडकडे जात होती. हा अपघात इतका भीषण होता की टँकर बसला मोडत पुढे गेला. बसचा निम्मा भाग रस्त्यावर पडला होता.
हा आवाज ऐकताच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.