आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sambhal (UP) Murder Update | Samajwadi Party Leader Chhote Lal Diwakar And His Son Shot Dead In Uttar Pradesh Sambhal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउनमध्ये हत्याकांड:सपा नेते आणि मुलाची रायफलने गोळ्या झाडून हत्या, फायरिंगचा लाइव्ह व्हिडिओ व्हायरल

संभलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परिसरात तनावाचे वातावरण, पोलिसांचा फौज फाटा तैनात

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात मंगळवारी सकाळी समाजवादी पार्टीचे नेते छोटेलाल दिवाकर (50) आणि त्यांचा मुलगा सुनील कुमार(28) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बहजोई क्षेत्रातील शमशोई गावात मंगळवारी सकाळी छोटेलाल मुलगा सुनीलसोबत शेतात फिरायला गेले होते. यादरम्यान त्यांचा आरोपींसोबत वाद झाला. या वादानंतर आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या हत्याकांडाचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.

पोलिस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी सांगितले की, 'बहजोई थाणे क्षेत्रातील शमशोई गावात मनरेगाअंतर्गत रस्त्याचे काम होणार होते आणि यासाठीच छोटे लाल दिवाकर आणि आरोपी सविंदर यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपीने छोटे लाल दिवाकर आणि मुलगा सुनील कुमार यांच्यावर रायफलमधून गोळ्या झाडल्या. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी काहीजणांना ताब्यात घेतले असून, आरोपींना पकडण्यासाठी तीन पथकांना रवाना करण्यात आले आहे.''

बातम्या आणखी आहेत...