आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2023 पासून वेळेत सुरू होणार आयआयटी:जेईई, नीट अन् सीयूईटीसाठी समान कॅलेंडर, 50 लाख विद्यार्थ्यांना लाभ

जयपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२३ मध्ये देशातील आयआयटीज, एम्स, मेडिकल काॅलेज व केंद्रीय विद्यापीठांचे सत्र निश्चित वेळेत होईल. कोविडनंतर २०२० ते २०२२ दरम्यान सर्व संस्थांमध्ये शैक्षणिक सत्र आणि सेमेस्टरमध्ये विलंब झाला. मात्र, आता शिक्षण मंत्रालय देशातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा नीट, जेईई आणि सीयूईटीसाठी २०२३ पासून एक समान कॅलेंडर जारी करण्याच्या तयारीत आहे. यामुळे परीक्षा आणि निकाल जाहीर करून सत्र सुरू केले जाऊ शकेल. दरवर्षी १६ लाख विद्यार्थी नीट आणि ८ लाख विद्यार्थी जेईई परीक्षेला बसतात. या वर्षीपासून सुरू झालेल्या सीयूईटीत १४.९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सीबीएसई १२ वीची परीक्षा दरवर्षी १२ ते १४ लाख विद्यार्थी देतात. चारही परीक्षांना मिळून ५० लाख विद्यार्थी सहभागी होत असल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...