आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयकर परतावा भरणे सुलभ:सर्व करदात्यांसाठी यापुढे समान आयटीआर फॉर्म

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्य नागरिकांसाठी आयकर परतावा भरणे सुलभ व्हावे यादृष्टीने अर्थ मंत्रालयाने आता नवीन प्रस्ताव आणला आहे. सर्व करदात्यांसाठी सामाईक आयकर परतावा फॉर्म (आयटीआर) आणि त्यामध्ये स्वतंत्र शीर्षकाखाली डिजिटल संपत्तीची नोंद करता येईल.

ट्रस्ट व स्वयंसेवी संस्था वगळता इतर सर्व करदात्यांना नव्या आयटीआर फॉर्मच्या माध्यमातून परतावा भरणे सोपे जाईल. त्यासाठी प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाने (सीबीडीटी) १५ डिसेंबरपर्यंत सर्व संबंधितांकडून सूचना मागवल्या आहेत. विद्यमान व्यवस्थेनुसार एकूण ७ प्रकारचे आयटीआर फॉर्म आहेत. यात आयटीआर फॉर्म १ (सहज) व फॉर्म ४ (सुगम) हे २ फॉर्म भरणे करदात्यांसाठी सुलभ आहे.

बातम्या आणखी आहेत...