आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Same Sex Marriage | Bundelkhand Village Girl Twinkle Relationship Story Same Sex Marriage In India

संडे भावविश्वसमलिंगींचे दुःख:मुलीशी लग्न होणे शक्य नाही, मुलाशी करणार नाही; ते माझे केवळ दोस्त बनू शकतात, लाइफ पार्टनर नाही!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी ट्विंकल... लोक मला 'टीके' म्हणतात... बुंदेलखंडच्या एका मागास गावात राहते. आम्ही 3 बहिणी, दोन्ही मोठ्या बहिणींचे लग्न झाले आहे. आता मी माझ्या आईवडिलांसोबत घरी एकटीच राहते. मी नोकरीबरोबर शिक्षणही घेत आहे.

माझ्याविषयी हे सर्वकाही जाणून घेतल्यानंतर, तुम्हाला माझे जीवन नॉर्मल वाटत असेल. पण ते तसे नाही. सध्या मी एका विचित्र कोंडीत सापडले आहे. माझ्या जीवनातील गुंता एवढा वाढला आहे की, तो सोडवण्याचा कोणताही मार्ग नाही.

कुणाला काय बोलावे, काय बोलू नये, काहीच समजत नाही. मला एवढेच माहीत आहे की, खरे बोलण्याचा परिणाम वाईट होतो.

खरे तर मी एक मुलगी आहे. माझे एका मुलीवर प्रेमही आहे. गत 2 वर्षांपासून मी तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

आम्हा दोघांना आता लग्न करायचे आहे. मला माहित आहे की माझा समाज, माझे कुटुंब समलिंगी विवाहाला केव्हाही मान्यता देणार नाहीत.

मी त्या मुलीविषयी उघडपणे बोलूही शकत नाही. ती माझ्यापूर्वी एका माणसासोबत रिलेशनमध्ये होती. आता माझ्यासोबत आहे. हे लोकांना कळले तर ते सर्व दबाव त्या मुलीवर टाकतील. तिचे लग्न दुसऱ्याच कुणाबरोबर लावून देतील.

आई-वडीलही माझ्या लग्नासाठी मुलगा शोधत आहेत. त्यांना कसे नकार द्यावा हे मला कळत नाही. माझी कायम मुलींसोबतच राहण्याची इच्छा आहे व सध्याही मी एका मुलीसोबत राहते हे मी त्यांना कसे सांगू?

यासाठी मी केव्हाही कोणत्याही मुलीवर जबरदस्ती केली नाही हेही खरे आहे. आत्तापर्यंत मुलींनी स्वतःच्या इच्छेने माझ्याशी संबंध ठेवलेत.

आजपर्यंत माझे एकाही मुलाशी अफेअर झाले नाही. मला त्यांच्यासोबत कपल म्हणून राहणे केव्हाच आवडले नाही.

मुले माझ्याशी इतर मुलांसारखेच बोलतात.

मुले केवळ माझे मित्र असू शकतात, जीवनाचा जोडीदार नहाी. या स्थितीत मी त्यांच्याशी लग्न करण्याचा विचारही करू शकत नाही.

कुटुंबीय लग्नासाठी मुलगा शोधत आहेत. तसे झाले तर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल.
कुटुंबीय लग्नासाठी मुलगा शोधत आहेत. तसे झाले तर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल.

मोठ्या समाज व शहरांत अशा भावनांना काय म्हणतात, हे मला माहीत नाही. पण माझ्या समाजात तरी तूर्त हे मान्य नाही.

आता मी त्या मुलीविषयीच्या माझ्या भावना कशा समजावू, जगाच्या दृष्टीने हे सर्व चुकीचे आहे. माझ्या नात्याच्या गोंधळामुळे मी बर्‍याचदा तणावात राहतो.

ज्या दिवशी मी केस कापून टॉम बॉय झालो त्या दिवशी माझ्या घरात गोंधळ उडाला. कुटुंब सोडा, माझ्या गावकऱ्यांनीही माझे जगणे कठीण केले होते. गावातील प्रत्येक मुलगा मला अशा छोटय़ाशा गोष्टीसाठी टोमणे मारत होता.

प्रत्येकाचे विचार वाईट असतात असे नाही. काही चांगले लोक लिंग बदलण्याचा सल्ला देतात. त्या मुलीशी लग्न करण्यासाठी मी ते करायलाही तयार आहे. त्यासाठी 2 लाख रुपये खर्च येणार आहे. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत.

आता दिल्ली व मुंबईत ही प्रथा आहे. पण माझ्या कुटुंबासाठी व गावासाठी नाही. देवसुद्धा अशा समाजात आपल्यासारखी माणसे निर्माण करतो जिथे ना पैसा असतो ना कुटुंबाचा आधार. येथून पळून जाण्याची हिंमतही माझ्यात नाही.

कुटुंबाची आर्थिक जबाबदारीही माझ्या खांद्यावर आहे. मी सध्या करत असलेल्या नोकरीत मला दरमहा 2500 रुपये मिळतात. माझे वडील नाममात्र पैसे कमावतात. त्यांना सोडून मी त्या मुलीसोबत पळून जाऊ शकत नाही. असे केल्याने मी स्वार्थी ठरेन. आयुष्यभर पश्चाताप होईल.

माझ्या मधव्या बहिणीच्या लग्नावेळी माझे वडील अंथरुनाला खिळले होते. ते एवढे आजारी होते की, त्यांना गमावण्याची भीती प्रत्येकाच्या मनात होती. त्यावेळी जेवणासाठीही पैसे नव्हते. लग्नासाठी कर्ज घेतले होते.

आम्हाला चारही बाजूंनी संकटांनी घेरले होते. तेव्हा मी 14-15 वर्षांचा होतो. मला माझ्या कुटुंबाला मदत करता आली असती, तर किती चांगले झाले असते.

मी माझ्या वडिलांची तळमळ पाहिली आहे. माझ्या स्वार्थासाठी, मी लोकांकडून त्रास व टोमणे सहन करण्यासाठी कुटुंबाला वाऱ्यावर सोडू शकत नाही. मी घरातून पळून जाऊ शकत नाही.

दुसरीकडे समाजाचे नियम, कायदे मान्य करणे आता शक्य नाही.

कुटुंबीय लग्नासाठी मुलगा पाहण्याविषयी विचारतात. पण असे केल्यास अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल.

माझ्या भावना माझ्या घरच्यांना सांगण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला. मी माझ्या बहिणींनाही सत्य परिस्थिती सांगितली. पण त्यांना मी थट्टा करत असल्याचे वाटते. त्या माझ्यावर हसतात, तेव्हा मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत राहतो.

आता शिकायचे हाच एकमेव विचार डोक्यात आहे. शिक्षण हीच माझी शेवटची आशा आहे. काही कमावून कुटुंब सेटल झाल्यानंतर मी येथून निघून जाईन.

येथे राहून मला त्या मुलीशी लग्न करणे शक्य नाही. मी कोणत्याही मुलाशी केव्हाच लग्न करणार नाही.

ट्विंकलने या सर्व गोष्टी दिव्य मराठी नेटवर्कच्या रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्यासोबत शेअर केल्या आहेत....