आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Same Sex Marriage | Gujarat Rajpipla | Gay Prince | Prince Manvendra Singh Gohil

संडे भावविश्वराजपुत्र समलैंगिक असणे गुन्हा:समलिंगी होऊ नये म्हणून ब्रेन सर्जरीचा कट; मंदिरात मारहाण, राम नाम लिहिण्याचा दबाव

वडोदरा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी मानवेंद्र सिंह गोहिल.... गोहिल घराण्याच्या राजपिपला संस्थानाचा राजपुत्र... मी या संस्थानाचा 39 वा वारस...राजवाडा...नोकरांचा ताफा... महागड्या गाड्यांच्या रांगा आदी सर्व सांसारिक सुख-विलास माझ्या पायाशी लोळत होते...

पण मनाला शांतता नव्हती...

आणखी एक गोष्ट माझ्याकडे नव्हती. आई-वडिलांचे प्रेम. राजवाड्यांच्या उंच भिंती केवळ बहिऱ्याच नव्हत्या तर अंधही होत्या. राजवाड्याच्या प्रोटोकॉलच्या नावाने नुसते निर्बंध होते. राजघराण्याला माझी असहायता व अस्वस्थता समजली नाही. राजघराण्यातील मान-सन्मान व प्रतिष्ठेपुढे सर्व जगच त्याला थिटे वाटत होते.

राजवाड्याच्या चकचकीत भिंतींच्या मागे रंगहीन जग होते. महागड्या झुंबरांच्या दिव्याखाली किती अंधार होता हे फक्त मलाच माहीत आहे.
राजवाड्याच्या चकचकीत भिंतींच्या मागे रंगहीन जग होते. महागड्या झुंबरांच्या दिव्याखाली किती अंधार होता हे फक्त मलाच माहीत आहे.

त्यावेळी मी 14 वर्षांचा होतो. एका मित्राच्या घरी गेला. तिथे तो आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलेला दिसला. ते दृश्य पाहून मला धक्काच बसला. मुलगा आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपू शकतो आई आपल्या मुलांना स्पर्श करू शकते हे हे मला त्या दिवशी प्रथमच कळले.

माझी आई जैसलमेरची राजकुमारी रुक्मिणी देवी आहे, पण माझे पालनपोषण धाईमांने केले. ती माझ्या आईची पालक आई देखील होती. ती माझ्यासोबत झोपायची, मला जेऊ घालायची. शाळेसाठी तयार करायची, तापात माझी काळजी घ्यायची. रात्री ब्रश पाण्यात भिजवायची.

धाईमांच माझे जग होते. मी तिला आई म्हणायचो, आई मानायचो. कधीकधी माझी जैविक आई मला पाहण्यासाठी राजवाड्यात येत असे. तिला पाहून माझ्या मनात केव्हाच आईची भावना निर्माण झाली नाही. राजवाड्यात राहणारी ही महिला केवळ महागड्या साड्या व दागिने घालून फिरण्यासाठी आहे, असे मला वाटत होते.

मी 8 वर्षांचा झालो तेव्हा धाईमाने मला सांगितले की, माझी खरी आई रुक्मिणी देवी आहे. ती म्हणाली, तू आता मोठा झालास. मी फक्त तुझी दाई आहे, हे सत्य तुला कळले पाहिजे. मी येथे सेवक म्हणून काम करते. ज्या दिवशी हे लोक मला काढून टाकतील त्या दिवशी मला निघून जावे लागेल.

हे ऐकून माझे तिच्याशी मोठे भांडण झाले. केवळ तू माझ्यासोबत झोपतेस, माझी संपूर्ण कामे करते आणि ती बाई केवळ साडी व दागिने घालते. तिला भेटण्यासाठीही अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तिच्यासमोर सरळ उभे राहावे लागते. ती माझी आई होऊ शकत नाही.

ही राजवाड्याची प्रथा असल्याचे धाईमाने स्पष्ट केले. हे सगळं कळल्यावर मी 3 महिने रडलो. धायमा माझी आई नाही हे सत्य मी बदलू शकलो नाही. दुसरे सत्य हे देखील होते की, खऱ्या आईशी फारच कमी व एका निश्चित अजेंड्यावरच बोलणे होत होते. राजवाड्यातही तिला तिच्या उपाधीनेच बोलावावे लागले.

लहानपणापासून मला राजपुत्रांच्या वागण्याबोलण्याची पद्धत शिकवली गेली. टेबलावर चाकू-काट्याने जेवण करणे शिकवले गेले. आजही हाताने कसे खायचे ते कळत नाही. उठणे-बसणे, कधी बोलावे, किती बोलावे व विशेषतः गप्प राहण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मित्र कसे बनवावे व कोणाला करू नये याचाही माझ्या प्रशिक्षणात समावेश होता.

मुलींना मैत्री करायला अजिबात परवानगी नव्हती. राजवाड्यात केवळ माझे बालमित्रच येऊ शकत होते. मी पण केवळ मुलांच्या घरी जाऊ शकत होते. तिथे सेवकांच्या ताफ्यासह जावे लागत असे. राजकुमार असणे म्हणजे लाखो बंधने.

कसे तरी हे बालपण गेले. बंधनांच्या, नियमांच्या ओझ्याखाली मुक्तपणे जगण्याची इच्छा कुठेतरी गुदमरत होती. मला नेहमी एका गोष्टीची आठवण ठेवावी लागत होती, ती म्हणजे प्रतिष्ठा.

प्रिन्स मानवेंद्र आपले आई-वडील व बहिणीसोबत.
प्रिन्स मानवेंद्र आपले आई-वडील व बहिणीसोबत.

आम्ही दोघे भाऊ- बहिण होतो. आमचे पालक मुंबईला आमच्या शिक्षणासाठी आले होते. मला मुंबईच्या स्कॉटिश शाळेत प्रवेश मिळाला. सांताक्रूझमध्ये आमचा 7 बेडरूमचा आलिशान बंगला होता.

आमच्या 5 जणांसाठी 22 नोकर होते. 3 स्वयंपाकी होते. 1 शुद्ध शाकाहारी, 1 शुद्ध मांसाहारी, 1 माझ्या आजीच्या स्वयंपाकासाठी होता. तो गुजराती पदार्थ करत होता. याशिवाय धाईमाचे किचनही वेगळे होते. त्यात राजस्थानी पदार्थ केले जात होते.

माझ्या जीवनात एकही मित्र नव्हता. मला नेहमी भीती वाटत होती की, एखाद्याशी मैत्री केल्याने माझी निंदा होईल. त्यामुळेच मी कधीही कुणाशीही आपल्या मनाची गोष्ट बोलू शकत नव्हतो. कुणापाशीही तोंड उघडू शकलो नाही. छोट्या - छोट्या गोष्टींसाठी नोकरांवर अवलंबून होतो.

शाळेतून आल्यावर मी दाईंसोबत किंवा पुरुष नोकरांसोबत खेळायचो. आमचा 1 नोकर होता. वयाने तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. त्याची जबाबदारी मला आंघोळ घालण्याची होती. आंघोळ करताना आम्हा दोघांना एकमेकांबद्दल आकर्षण कधी निर्माण झाले ते कळलेच नाही. हळूहळू आमच्यात शारीरिक संबंधही निर्माण होऊ लागले. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी, मी व माझा नोकर एकमेकांचे शरीर एक्सप्लोर करत होतो.

घरातील एका पुरुष नोकराने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. आम्ही दोघे बंद खोलीत काय करत होतो, हे कुणालाच कळत नव्हते. मी कोणत्या जगात राहत होतो हे केवळ मलाच माहिती होते. मला एखाद्या मुलीला भेटण्याची परवानगी मिळाली असती, तर कदाचित मला मुलगी म्हणजे काय, तिल्या कोणत्या भावना असतात हे समजले असते.

मी 16 वर्षांचा होईपर्यंत रस्ता कसा ओलांडायचा हे मला माहित नव्हते. आजही ते येत नाही. एके दिवशी मी रस्त्यावर अनेक तास उभा राहिलो. पण रस्ता ओलांडण्याचे धाडस मला जमले नाही. शेवटी एक कुत्रा आला व आरामात रस्ता ओलांडू लागला. मी त्याच्यामागे जाऊन रस्ता ओलांडला. म्हणजे मी कुत्र्याच्या मदतीने रस्ता ओलांडला.

महालाचे विहिरासारखेच जगच माझे जग होते. मी मोठा होत गेलो तसतशी माझ्या आईची माझ्याबद्दलची द्वेषपूर्ण वागणूक वाढत गेली. मी माझ्या प्रियजनांना क्वचितच भेटू शकलो. काहीही बोलण्याची किंवा सांगण्याची परवानगी नव्हती.

दरम्यान, माझ्या बहिणीच्या दाईमाला टीबी झाला. त्यात त्या गेल्या. माझ्या बहिणीच्या संगोपनाची जबाबदारी माझ्या आईने स्वतःवर घेतली. माझी आई माझ्या बहिणीवर प्रेम करते हे मी बघायचो. ती तिला वेळही देत होती. ती तिच्यासोबत एखाद्या सामान्य आईसारखी राहत होती.

पण तिचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन चांगला नव्हता. ती माझ्याशी केव्हाच बोलली नाही. तिचे हे वागणे मला आतून दुखावत होते. मी पोकळ झालो होतो.

माझ्या आईला माझ्याशी कोणतीही ओढ नव्हती. मलाही तिच्याशी आसक्ती नव्हती. माझ्या आईला स्वतःच्या आईबद्दल व मामांना त्यांच्या आईबद्दल कोणतीही ओढ नव्हती. हे मी स्वतः अनुभवले आहे.

आजोळच्या राजघराण्यातील नाती मी पाहिली. तिथे कुणालाही कुणाची ओढ नव्हती. कदाचित मी स्वतः असाच मोठा झालो.

माझ्या लग्नाची चर्चा होती. मला अनेक राजकन्यांचे फोटो दाखवण्यात आले. झाबुआ या छोट्या संस्थानातील राजकन्येशी माझा विवाह माझ्या संमतीने झाला.

माझ्या पत्नीचे कुटुंब राजवाड्यात राहत नव्हते. तिचे वडील बँकेत अधिकारी होते. ते एका फ्लॅटमध्ये राहत होते.

लग्नाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही कधीच शारीरिक संबंध ठेवू शकलो नाही. हळुहळु ह्या गोष्टीचा माझ्या बायकोला त्रास होऊ लागला. राजवाडा, पैसा, कीर्ती, संपत्ती, नोकर, दागिने, सर्व काही तिच्यासाठी निरर्थक होऊ लागले.

लग्नाच्या दीड वर्षानंतर आम्ही दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. आमच्यात एकदाही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नव्हते. माझी पत्नी न्यायालयात हे सिद्ध करू शकली. अखेर आमचा घटस्फोट झाला.

मी मानसिकदृष्ट्या पूर्णतः कोसळलो होतो. माझी पत्नी खूप सुंदर असतानाही माझे लग्न का टिकले नाही याचा विचार करत राहिलो. ती पेंटिंग करायची व मी हार्मोनियम वाजवायचो. आम्ही दोघे खूप चांगले मित्र झालो.

घटस्फोटाच्या एका वर्षानंतर तिने दुसरे लग्न केले. हे ऐकून माझे आई-वडील अस्वस्थ झाले. राजकन्येचे लग्न झाले, पण आमच्या मुलाने केले नाही हे त्यांना अपमानास्पद वाटले.

दुसरीकडे, मी गोंधळात होतो. मी स्वतःला शोधत होतो. आता मी एकटाच राजवाड्याबाहेर फिरण्यास जाऊ लागलो. राजवाड्याबाहेरचे जग पाहू लागले. एकट्याने रस्ता ओलांडला, शॉफरशिवाय गाडी चालवली. ट्रेनने प्रवास केला. म्हणजे राजेशाहीचे सगळे नियम - कायदे मोडण्यास सुरुवात केली.

हे सर्व पाहून आईचा राग गगनला भिडला. जेवणाच्या टेबलावर आम्ही सगळे एकत्र होतो. त्यावेळी एकच गोष्ट होती...लग्न कर, लग्न कर. आम्ही सांगू तिथेच करावे लागेल. दिवसरात्र लग्न… लग्न… लग्न.

माझे पहिले लग्न मोडल्यानंतर मी पुन्हा लग्न न करण्याचा निर्धार केला होता. माझ्या पत्नीनेही मला सांगितले की, दुसऱ्या महिलेचे आयुष्य उध्वस्त करू नको. एकट्याने जगाचा शोध घेतल्यावर मला असे दिसून आले की, मला स्त्रियांबद्दल कोणतेही आकर्षण नाही.

वयाच्या 30 व्या वर्षी मला पहिल्यांदा कळले की, मी समलिंगी आहे. देशातील प्रसिद्ध कवी अशोक राय आमच्या शेजारी राहत होते. मी त्याच्याकडे जाऊन सर्व प्रकार सांगितला. ते म्हणाले की, तुम्ही 'गे' अर्थात समलिंगी आहात.

राजवाड्यातल्या आई-वडिलांकडून लग्नाचा दबाव इतका वाढला की, त्या दबावाखाली माझे नर्व्हस ब्रेकडाउन झाले. मी रुग्णालयात दाखल झालो. एक मानसोपचार तज्ज्ञ माझ्यावर उपचार करत होते. मी त्यांना सगळे सांगितले.

त्यांनी मला खूप साथ दिली. समलैंगिकता हा आजार नाही, काळजी करू नका. मी याविषयी तुझ्या पालकांशी बोलेन, असे ते म्हणाले.

एकेदिवशी त्यांनी माझ्या आई-वडिलांना फोन करून सांगितले की, तुमचा मुलगा 'गे' आहे. मुलीशी लग्न करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणू नका. हे ऐकून त्यांनी डॉक्टरांनाच फटकारण्यास सुरुवात केली. माझी आई म्हणू लागली की, तुम्ही खोटे बोलत आहात. आम्ही आमच्या मुलाला सुरुवातीपासूनच खूप चांगली वागणूक दिली.

'गे' असण्याचा संस्कृतीशी काहीही संबंध नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तेव्हा माझी आई म्हणाली की, कवी अशोक राय हेही 'गे' आहेत. त्यांनी त्याला 'गे' बनवले आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच या गोष्टीचा अपप्रचार होत आहे.

आई मला उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन गेली. त्यांनी आईला समजावून सांगितले की, कुणीही कुणाला 'गे' बनवू शकत नाही. तुम्ही काहीही करा, तुम्ही त्याची ओळख बदलू शकत नाही.
आई मला उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन गेली. त्यांनी आईला समजावून सांगितले की, कुणीही कुणाला 'गे' बनवू शकत नाही. तुम्ही काहीही करा, तुम्ही त्याची ओळख बदलू शकत नाही.

माझ्या आईला यावर भारतात उपचार शक्य नसल्याचे समजल्यानंतर तिने माझ्यावर अमेरिका व कॅनडातील उपचारांची माहिती घेतली. माझ्या मेंदूची शस्त्रक्रिया अमेरिकेत करण्याचे ठरले. सेरेब्रम मेंदूची शस्त्रक्रिया करून मला विजेचे झटके दिले जातील, असे निश्चित झाले.

त्याचवेळी अमेरिकन सायकोलॉजी असोसिएशनचा एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्यात समलैंगिकता हा मानसिक आजार नाही असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे मला परदेशात पाठवण्याचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला.

जिथे विज्ञानाचे चमत्कार संपतात तिथे धर्म हा इलाज आहे. माझ्या पालकांनीही तेच केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत मला प्रत्येक मंदिरात, मशिदीत, झाडफूक करणाऱ्यांकडे नेले.

मध्य प्रदेशातील एका मंदिरात मला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. मला कुणीतरी सायंकाळी दिवा लावण्यास सांगितले. तो मी लावला. मला कुणीतरी शाकाहारी व्हायला सांगितले, मी झालो. कुणी म्हणाले विहीरीतील पाणी प्या, मी प्यालो. कुणीतरी म्हणाले- वहीवर राम-राम लिहा, मी लिहिले. कुणी म्हणाले योगा करा, मी हे सर्व केले.

त्यानंतर मला जाणवले की, माझी ओळख पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे.

आता माझ्या आईकडे माझ्याविरोधात एकच हत्यार उरले होते. मालमत्तेतून बेदखल करण्याचे. त्यांनी मला संपत्तीतून बेदखल केले. एक एक करून मला विविध कंपन्या व फर्ममधून बाहेर काढण्यात आले.

मला सांगण्यात आले की, मी एक वेडा आहे. कंपनीच्या नियमांनुसार, वेडा संचालक, भागीदार किंवा सदस्य पदावर राहू शकत नाही.

मला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यात आले. माझ्या आईने माझ्या शाळेचे सर्व रेकॉर्ड जाळून टाकले. माझे हार्मोनियम वाजवणे बंद केले. माझे गुरू राजवाड्यात येणे बंद झाले. प्रजेला माझ्याविरोधात केले गेले.

माझ्याकडून माझी उपाधी हिसकावून घेण्यात आली. लोकांना सांगितले की, यापुढे त्याला कुणीही राजपुत्र म्हणणार नाही. मी जेव्हाही राजवाड्यातून बाहेर जायचो, तेव्हा लोक माझे पुतळे जाळायचे. मला वेडा ठरवण्याचे प्रयत्न मर्यादेपलीकडे जात होते.

वैतागून मी मनात निश्चय केला की, आई नव्हे मीच जगाला माझी सत्य परिस्थिती सांगणार..

मी एका पत्रकाराशी संपर्क साधला. राजपिपळा राजघराण्याचा राजपुत्र 'गे' असल्याची मुलाखत दिली. अराजकता निर्माण केली. मला मालमत्तेतून बाहेर काढण्यासाठी वर्तमानपत्रात रीतसर जाहिरात देण्यात आली होती.

जाहिरातीत लिहिले होते की, मी असे काही काम करतो, ज्याला समाज परवानगी देत नाही. म्हणूनच आम्ही त्याला राजघराण्यातून व मालमत्तेतूनही बेदखल करत आहोत.

या घटनेपूर्वी मला शेवटचे सांगण्यात आले होते की, तुला राजवाड्यात राहायचे असेल तर तुला लग्न करावे लागेल. लग्न करायचे नसेल तर साधू व्हावे लागेल.

मी मनात विचार केला की, मी का साधू होऊ. मला लग्न करायचे आहे. मला गृहस्थ जीवन जगायचे आहे. पण स्त्रीसोबत नाही तर पुरुषासोबत.

मला राजवाड्यातून हाकलून दिले गेले. माझी दाईपण वारली होती. मला खूप दुःख झाले. कवी अशोक राय यांच्या घरी जाऊन राहू लागलो.

मी माझे जग राजवाड्याबाहेर सामान्य माणसांमध्ये शोधू लागलो. 2007 मध्ये, ओप्रा विन्फ्रेने माझी मुलाखत वाचल्यानंतर मला शिकागो येथे तिच्या शोमध्ये निमंत्रित केले. माझी मुलाखत घेतली. मी ऑपेरा शो मध्ये सांगितले की, राजवाड्यांमध्ये मर्यादेपलीकडचे ढोंगी राहतात.

आजपर्यंत जगातील एकाही राजघराण्यातील व्यक्तीने स्वत:ला 'गे' म्हणवून घेतले नाही. मी जगातील पहिला राजकुमार आहे, ज्याने राजवाड्यातून बाहेर पडून मी 'गे' असल्याचे मान्य केले आहे.

ओप्रा विन्फ्रेच्या मुलाखतीनंतर माझा आत्मविश्वास वाढला. मी सांगितले की, भारतातील 80% समलिंगींचे लग्न जबरदस्तीने मुलींशी केले जाते.
ओप्रा विन्फ्रेच्या मुलाखतीनंतर माझा आत्मविश्वास वाढला. मी सांगितले की, भारतातील 80% समलिंगींचे लग्न जबरदस्तीने मुलींशी केले जाते.

ऑपेराच्या शोनंतर, मला या विषयावर बोलण्यासाठी प्रत्येक देशाने बोलावले. मी त्या देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती, संसद सदस्य व हॉलिवूड सेलिब्रिटींना भेटलो.

आमच्या देशातील नेत्यांना समजावून सांगा, असे सांगितले. मी त्यांना आमच्या देशाच्या पंतप्रधानांकडे आमचे हक्क देण्याची मागणी करण्याची विनंती केली.

एकदा ऑस्ट्रेलियाचे पहिले समलिंगी न्यायाधीश मायकल कुर्विन मुंबईत आले होते. तेव्हा सरकारने मला त्यांना भेटू दिले नाही. त्यांनी दिल्लीत न्यायमूर्ती एपी शहा यांची भेट घेतली. कदाचित त्यामुळेच आम्ही 2018 ची लढाई जिंकली. मी अजूनही LGBT हक्कांसाठी लढत आहे.

10 वर्षांपूर्वी मी डीआंद्रे रिचर्डसन या अमेरिकन माणसाशी लग्न केले. आम्ही दोघे जास्त काळ एकत्र राहू शकत नाही. अडीच वर्षे आमची भेट झाली नाही. यामागे सरकारी नियम व कागदपत्रांचे कारण आहे.

प्रिन्स मानवेंद्रचे लग्न डीआंद्रे रिचर्डसनशी झाले आहे. रिचर्डसनला 6 महिन्यांचा टुरिस्ट व्हिसा मिळाला. 6 महिन्यांनी त्यांना परत अमेरिकेला जावे लागते.
प्रिन्स मानवेंद्रचे लग्न डीआंद्रे रिचर्डसनशी झाले आहे. रिचर्डसनला 6 महिन्यांचा टुरिस्ट व्हिसा मिळाला. 6 महिन्यांनी त्यांना परत अमेरिकेला जावे लागते.

मला सरळमार्गी लोकांना विचारायचे आहे की, तुम्ही पती-पत्नी अडीच वर्षे एकमेकांपासून दूर राहू शकता का? जसे तुम्ही पती-पत्नी आहात, जसे तुमच्यातही प्रेम आहे. तसेच आम्हालाही एकत्र राहायचे आहे.

मी भारताची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हालाही आपला जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामुळे कुणालाही धोका नाही किंवा कोणते नुकसानही होणार नाही.

मानवेंद्र यांनी या सर्व गोष्टी भास्करच्या रिपोर्टर मनीषा भल्लासोबत शेअर केल्या आहेत.