आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:समलैंगिक विवाहप्रकरणी  सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या मागणीवर सुनावणी घेत सुप्रीम कोर्टाने विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित या विषयाच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकांवर १३ मार्चपासून सुनावणी सुरू होईल.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठ म्हणाले, या मुद्द्यावर गुजरात, दिल्ली, केरळ हायकोर्टासह इतर हायकोर्टात याचिका प्रलंबित आहेत. एकाच विषयावर वेगवेगळ्या याचिका दाखल आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सर्व याचिकांची एकाचवेळी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. एखादा याचिकाकर्ता किंवा त्यांचा वकिल कोर्टात हजर राहू शकला नाही तर तो डिजिटल व्यासपीठाची सुविधा घेऊ शकतो. याचिकाकर्त्यांचे वकील अरुंधती काटजू व केंद्राचे कानू अग्रवाल यांना नोडल काउंसिल नियुक्त केले.

बातम्या आणखी आहेत...