आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात समलैंगिक विवाहाला हिंदू कायद्यान्वये मान्यता देण्याची मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकेनंतर गुरुवारी न्यायालयाने केंद्र सरकार आणि संबंधित पक्षांकडून उत्तर मागवले आहे. यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
न्यायमूर्ती राजीव सहाय एंडलॉ यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले की, ‘आम्ही मुख्य याचिकाकर्ते अभिजित अय्यर मित्रा आणि याचिका करणाऱ्या इतर पक्षांच्याही प्रकरणांवर जानेवारीत एकत्रितरीत्या सुनावणी करणार आहोत.’ अभिजित अय्यर मित्रा यांनी आपल्या याचिकेत समलैंगिक जोडप्यांचे विवाह हिंदू विवाह कायद्यांतर्गत नोंदणी करण्याची मागणी केली आहे. हिंदू विवाह कायद्यात लग्न हे केवळ हिंदू पुरुष आणि महिलेतच व्हावे, अशी कोणतीही तरतूद नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने आयपीसीच्या कलम ३७७ मधून समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीतून वगळले होते, याचेही स्मरण मित्रा यांनी करून दिले. तरीही समलैंगिक जोडप्यांच्या विवाहांत अडचणी येत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.