आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरासाठी आणखी एका जैन मुनीने आपले प्राणार्पण केले आहे. गुरूवारी रात्री मध्यरात्री 1 वा. मुनी समर्थ सागर यांचे निधन झाले. ते सम्मेद शिखरजींसाठी देहत्याग करणारे गत 4 दिवसांतील दुसरे संत आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांनी प्राणार्पण केल्याची माहिती मिळताच जैन समुदायाच्या शेकडो नागरिकांनी त्यांचे वास्तव्य असणाऱ्या मंदिराकडे धाव घेतली.
संत समर्थ सागर यांची डोल यात्रा संघीजी मंदिरापासून विद्याधर नगरपर्यंत काढण्यात आली. यावेळी जैन संत शशांक सागर म्हणाले की, झारखंड सरकार सम्मेद शिखराला तीर्थक्षेत्र घोषित करत नाही तोपर्यंत मुनी असेच बलिदान देत राहणार.
जयपूरच्या सांगानेर स्थित संघीजी दिगंबर जैन मंदिरात समर्थ सागरजी 3 दिवसांपासून आमरण उपोषण करत होते. उल्लेखनीय बाब म्हणजे सम्मेद शिखराला पर्यटनस्थळ घोषित करण्याविरोधात याच मंदिरात जैन मुनी सुज्ञेयसागर महाराज यांनीही 3 जानेवारी रोजी देहत्याग केला होता.
आचार्य सुनील सागर महाराज यांच्या उपस्थितीत मुनी समर्थसागर यांना जैन परंपरेनुसार शुक्रवारी समाधी दिली जाईल.
ध्यरात्री उशिरा देहत्याग
सांगानेरच्या संघीजी दिगंबर जैन मंदिराचे मंत्री सुरेश कुमार जैन यांनी सांगितले की, शुक्रवारी मध्यरात्री 1 वा. जैन मुनी समर्थसागर यांनी आपला देहत्याग केला. त्यांनी श्री सम्मेद शिखर वाचवण्यासाठी आपल्या देहाचे बलिदान केले आहे. ते कायम स्मरनात राहतील.
समर्थसागर महाराज आचार्यं सुनील सागर महाराजांचे शिष्य आहेत. यापूर्वी सुज्ञेयसागर महाराजांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. तेव्हा समर्थ सागर यांनी धर्मसभेमध्ये आमरण उपोषणाचा संकल्प केला होता. तेव्हापासून ते उपवासावर होते.
केंद्राने आदेश मागे घेतले
पर्यटन व इको टूरिझमप्रकरणी केंद्राने गुरुवारी 3 वर्षांपूर्वी जारी केलेला आपला आदेश मागे घेतला. पण जयपूरमध्ये अद्यापही त्याचा विरोध सुरू आहे. जैन बांधवांच्या मते, केंद्र सरकारनंतर राज्य सरकारनेही आपला निर्णय मागे घेतला पाहिजे. ते निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत विरोध कायम राहील.
याच मंदिरात जैन मुलींनी दिले होते बलिदान
याच मंदिरात जैन मुनी सुज्ञेयसागर महाराजांनी मंगळवारी आपले प्राणार्पण केले होते. सम्मेद शिखराच्या मुद्यावर देशभरात निदर्शने सुरू आहेत. जयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी सकल जैन समाजाच्यावतीने मौन मोर्चा काढून विरोध प्रकट करण्यात आला होता. सकल जैन समाजाच्या (दिगंबर व श्वेतांबर) बॅनरखाली हजारो जण या निदर्शनांत सहभागी झाले होते. राजस्थानचे जैन युवा महासभेचे महामंत्री विनोद जैन यांनी सांगितले की, मुनी समर्थ सागर यांनी धर्मसभेदरम्यान उपोषण करण्याची घोषणा केली होती.
सम्मेद शिखरजीसाठी सुज्ञेय सागरजी यांनीही प्राणार्पण केले होते. त्यांच्या निधनाची खालील बातमी वाचा...सुज्ञेयसागरजींच्या निधनाविषयीची खालील बातमी वाचा...
तीर्थक्षेत्र वाचवण्यासाठी जैन मुनींचा प्राणत्याग:सम्मेद शिखरला 'पर्यटनस्थळ' बनविण्याच्या विरोधात होते; 10 दिवसांपासून उपोषण
झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरला पर्यटनस्थळ बनविण्यास विरोध करणाऱ्या जैन मुनी सुज्ञेयसागरजी महाराज यांनी मंगळवारी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात ते गेल्या 10 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले होते. तर आज त्यांनी प्राण त्यागले. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.