आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारने जैन धर्माचे जगप्रसिद्ध तीर्थस्थळ सम्मेद शिखरला पर्यटन क्षेत्रातून मुक्त केल्याचे आचार्य विद्यासागरजी महाराजांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात आचार्यश्रींनी प्रवचनात एका चिठ्ठीवरील हा संदेश वाचून दाखवला. मात्र, झारखंड सरकारकडून रात्री उशिरापर्यंत कुठलाही अधिकृत आदेश जारी झाला नाही. तत्पूर्वी, बुधवारी सरकारने गिरिडीहच्या डीसी-एसपींना तीर्थस्थळाचे पावित्र्य कायम राखण्याचे आदेश दिले.
झारखंडच्या पर्यटन विभागाचे सचिव मनोजकुमार यांनी डीसी-एसपी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, तेथे मांस-दारू विक्री व सेवनाच्या तक्रारी येत आहेत. पोलिस-प्रशासनाने कठोर पावले उचलावी. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २०१९ मध्ये पारसनाथ क्षेत्राला इको सेन्सेटिव्ह झोन घोषित केले होते. सम्मेद शिखरला पर्यटनस्थळ घोषित केल्याविरुद्ध जैन समाजात आक्रोश आहे, देशभरात विरोध होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.