आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sandesara Group Money Laundering Case Ahmed Patel Updates | Enforcement Directorate (ED) Team In Home Of Congress Leader Ahmed Patel

मनी लाँड्रिंग प्रकरण:ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरावर ईडीचा पुन्हा छापा, मनी लाँड्रिंग प्रकरणात 4 दिनवसांत दुसरी धाड आणि चौकशी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार मानले जाणारे राज्यसभा खासदार अहमद पटेल यांच्या घरावर पुन्हा ईडी (अंमलबजावणी संचलनालय) टीम पोहोचली आहे. वडोदरा येथील टेक कंपनी स्टर्लिंग बायोटेकचे प्रोमोटर संदेसरा बंधूंवर 5700 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याचे आरोप आहेत. याच संदर्भात ईडीकडून मनी लाँड्रिंगचा तपास सुरू आहे. त्याविषयी अहमद पटेल यांच्याशी प्रश्नोत्तरे केली जात आहेत.

आपला नकर्तेपणा लपवत आहे सरकार -पटेल

तत्पूर्वी ईडीने शनिवारी सुद्धा पटेल यांच्या निवासस्थानी जाउन त्यांची चौकशी केली होती. त्यांच्याशी संदेसरा बंधूंचे काय संबंध आहेत असे सवाल करण्यात आले आहेत. या चौकशीनंतर पटेलांनी ट्विट केले, की "माझ्याकडे लपविण्यासारखे काहीच नैाही. दुर्दैवाने मोदी सरकार आर्थिक आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर आपले नाकर्तेपणा लपविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी अशा तपास संस्थांची मदत घेतली जात आहे." दरम्यान, यापूर्वी झालेल्या चौकशीत ईडीने संदेसरा बंधूंना प्रश्न विचारताना त्यांच्यासोबत अहमद पटेल यांच्या संबंधांची देखील विचारणा केली होती. 2017 मध्ये संदेसरा बंधूंच्या विरोधात बँक घोटाळ्याचा खटला दाखल करण्यात आला. त्याच्याच आधारे ईडी मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे.