आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:त्रिवेंद्र गेले, तीरथ आले ! संघ प्रचारक तीरथसिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

डेहराडून (हिमांशू िघल्डियाल )एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शपथविधीनंतर म्हणाले, संतांचा मान सर्वोच्च, कुंभ - मेळ्याच्या अडचणी सोडवू
  • िवधानसभा निवडणुकीत तिकीट कापले, आता मुख्यमंत्री केले

भाजपने उत्तराखंडमध्येही धक्कादायक पवित्रा कायम ठेवला. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आघाडीवर असलेले धनसिंह रावत यांच्या जागी कमी चर्चित ५६ वर्षीय तीरथसिंह रावत यांना बुधवारी सकाळी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवडले. दुपारनंतर तीरथसिंह यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात एका अर्थाने मुख्यमंत्र्यांचा चेहरा बदलला, पण सीएम हाऊसमध्ये नेम प्लेट तीच राहणार आहे. माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत हे दोघेही टी. एस. रावत म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसमधून आलेले सतपाल महाराज यांच्यासाठी तीरथसिंह यांचे तिकीट कापले होते. आता त्यांनाच मुख्यमंत्री केले आहे. तीरथ सध्या पौडी गढवालचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांत आमदार व्हावे लागेल. शपथ घेतल्यानंतर तीरथसिंह म्हणाले की, पहिले काम कुंभमेळ्याबाबतच्या सर्व अडचणी दूर करणे हे आहे. संतांचा मान सर्वोच्च आहे.

हरियाणा : खट्टर सरकारविरुद्धचा काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला
चंदीगड| हरियाणा विधानसभेत काँग्रेसने बुधवारी मनोहरलाल खट्टर सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला. प्रस्तावाच्या बाजूने ३२ तर विरोधात ५५ मते पडली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळून लावला. ९० सदस्यांच्या विधानसभेत ८८ सदस्य आहेत. बहुमतासाठी ४५ मते आवश्यक होती. भाजपचे ४०, सहकारी जननायक जनता पार्टीचे १० सदस्य आहेत. पाच अपक्ष आमदारांचाही भाजपला पाठिंबा आहे.

पक्षाचे निर्णय बदलणे खूपच कठीण होणार
निवडणुकीआधी भाजपबद्दलची नाराजी दूर करणे हे तीरथसिंह यांच्यासाठी मोठे आव्हान असेल. पक्षाचे निर्णय मागे घेणे हेही कठीण काम असेल. काँग्रेसमधून भाजपत आलेल्या नेत्यांशी समन्वय ठेवावा लागेल व व्यक्तिगत प्रचारापासून दूर राहावे लागेल.

त्रिवेंद्र यांच्या प्रभावात राहिले असते, त्यामुळे सहमती नाही
आमदारांनी धनसिंह यांना उघड विरोध केला आणि निर्विवाद नाव देण्यास सांगितले. त्रिवेंद्र यांचे कट्टर समर्थक असल्याने धनसिंह त्यांच्या प्रभावाखाली काम करतील, असे त्यांचे म्हणणे होते.

तीरथ झगमगाटापासून दूर, अभाविपपासून सुरुवात
तीरथसिंह झगमगाटापासून दूर राहणारे नेते आहेत. विद्यार्थिदशेत अभाविपत होते. १९८३ मध्ये संघ प्रचारक झाले. ९० च्या दशकात उत्तराखंड आंदोलनात सक्रिय होते. उत्तराखंड स्थापनेनंतर पहिले शिक्षणमंत्री झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय सचिवही होते.
तीरथ उत्तराखंड भाजपचे दोनदा अध्यक्ष होते. वादांपासून दूर आणि सर्व गटांशी समन्वय हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

बातम्या आणखी आहेत...