आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरियाणाच्या समालखामध्ये रविवारपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सुरू झाली. देशभरातून ३४ संघटनांचे १४७४ प्रतिनिधी या सभेत भाग घेत आहेत. प्रतिनिधी सभेने पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीआधी देशात एक लाख ठिकाणांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प सोडला आहे. ४२% शाखांचे वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या देशाला ७१,३५५ ठिकाणी संघ कोणत्या ना कोणत्या रूपात कार्य करत आहे. पहिल्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांचे भाषण झाले. भाजपाध्यक्ष जेपी नड्डाही सहभागी झाले. सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य म्हणाले, महिलांना संघाशी जोडण्याबाबत विचार होईल. ५ वर्षात संघाशी जोडण्यासाठी ७.२५ लाख अर्ज आले. यापैकी अनेक २० ते ३५ वयोगटातील आहेत. पहिल्या सत्रात वर्षभरात निधन झालेल्या १०८ दिग्गजांच्या उल्लेख केला. सप नेते मुलायमसिंह यादव, पंतप्रधानांच्या आई हीराबेन हास्य अभिनेते सतीश कौशिक यंाना श्रद्धांजली वाहिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.