आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भारतीय चलन खराब झाले आहे. कारण, लोकांनी नोटांना सॅनिटाइझ केले, त्या धुतल्या आणि उन्हात वाळत घातल्या. यामुळेच भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) येणाऱ्या खराब नोटांच्या संख्येने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, यावर्षी दोन हजारांच्या १७ कोटी रुपयांच्या नोटा खराब झाल्या आहेत. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०० पट जास्त आहेत. दुसऱ्या स्थानी २०० रुपयांच्या नोटांचा क्रमांक लागतो, तर तिसऱ्या स्थानी ५०० रुपयांच्या नोटांचा क्रमांक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्व नोटा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. चलनामुळे संसर्ग होण्याची लोकांना भीती वाटत होती, असे अहवालात म्हटले आहे. तसेच अनेक अहवाल आल्यानंतर लोकांनी चलन सॅनिटाइझ करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला लोकांनी नोटा धुतल्या. त्यानंतर अनेक तास नोटा उन्हात वाळत घातल्या. बँकांमधूनही नोटावर सॅनिटायझर स्प्रे करण्यात येत होते. परिणामी जुन्या तर झाल्याच, पण नव्या नोटाही वर्षभरात खराब झाल्या. आरबीआयने जारी केलेल्या अहवालात स्पष्ट होते की, दहा रुपयांपासून दोन हजारांपर्यंतच्या नोटा प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने खराब झाल्या आहेत. दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद झाली आहे. गेल्या वर्षी दोन हजारांच्या ६ लाख नोटा आरबीआयकडे बदलण्यास आल्या. यावर्षी ही संख्या १७ कोटींपेक्षाही जास्त आहे.
९५ टक्के लोकांची रुपयाच्या नाण्याकडे पाठ
आरबीआयने दिलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी एक रुपयाच्या दोनशे कोटी रुपयांच्या नाण्यांची मागणी होती. या वर्षी त्यात घट होऊन फक्त १२ कोटी रुपयांची मागणी आली. म्हणजे ९५ टक्के लोकांनी एक रुपयाची नाणी स्वीकारणे बंद केले. दहा रुपयाच्या नाण्यांनाही कंटाळले. गेल्या वर्षी दहा रुपयांची २०० कोटी रुपयांच्या नाण्यांची मागणी होती. परंतु यावर्षी केवळ १२० कोटी रुपयांच्या नाण्यांची मागणी होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.